पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिद्धीतें पावलें तर कळसारोपण तुझेच हातें करवीन. एक उंट आपला पाठवून देणें. नगारेची जोडी देवास पाठवून देतों. देवद्वारीं ठेवं. ११ प्रतिनिधि श्री. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव श्रीनिवासराउ प्रतिनिधि यांसी आज्ञा ऐसीजे:- येथें इमारतीचे बेगमीस तांदुळ पाहिजेत. याजकरतां कांगोरीखाले बिरवाडी तरफेत तांदूळ घेतले आहेत. बैल पाठवून आणवणार. त्यास जकातीचे दस्तक पारघाटचे तलघाट वरघाट कांगोरी पावेतों कमावीस- दारांस पावणशें बैलांचें दिल्हें पाहिजे. प्रतापगडची एक शीव आहे. त्यास निराळे गडकरीयांस व तळघाट वरघाट जकातदारांस, जेणेंकडून खटखटा कोणी न करीत, ऐसीं पत्र देऊन पाठविलीं पाहिजेत. विशेष लिहिणें तरी सुज्ञा असा. हे आज्ञा. १२ पुरंदरे. [ लेखांक ३३४] - [ लेखांक ३३५] श्री. श्रीमत् परमहंस यांहीं मननिर्मल गंगाजल आचार्ये पुण्यपवित्र चिरंजीव दादोबा व म हादोबा यांसी आज्ञा केली ऐसीजे:- कृष्णाजीस मूठभर पोहे अर्पावे सुदामदेवानें. ती वर्षांचा ऐवज रुपये १००० व वस्त्र वर्षास सुसी घेतों. यंदा उत्तम किमखाप चाळीस रुपयांचे पाठवणे. वर्षास मुसीची दुलई व मुसीची कुडती करितों. यंदा किमखापी करावी ह्मणून किम- १. ह्या पत्रावर कोणास लिहिले त्याचें नांव नाहीं. तथापि हे पत्र आंगन्यांच्या इतर पत्रांत सांपडले असून त्यांतील संबंधही त्यांचाच दिसतो. त्यावरून ते आं गर्योच्या सदराखाली दाखल केले आहे.