पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/४५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०७ खाप लिहिला आहे. तर चाळीस रुपये अगर थान पाठवावें. ह्मणजे कुडती करूं. तुझी आमची आज्ञा पाळितां ह्मणून आह्मी लिहितों.. तुझांस लिहावें ना तर कोणास लिहावें ? तर रुपये व किमखाप पाठवून दीजे. नये चित्तास तर रुपयेही नको व किमखापही नको! कळले. पाहिजे. विशेष काय लिहिणें हे आज्ञा. [लेखांक ३३६] श्री. श्रीमत् परमहंस स्वामी यांहीं सहस्रायु चिरंजीव मल्हार तुकदेव यांसी आज्ञा केली ऐसीजे:- तुझांकडे श्रीचें येणें ते गु ॥ खंडोजी साळवी येणेंप्रमाणे पावले रुपये:- १००० भिक्षा ती वर्षों द्यावी ते पावले. ४० वस्त्रांपैकीं. एकूण एक हजार चाळीस रुपये पावले. विशेष काय लिहिणें. छ० १४ सेवाल सुमा आर्बेन मया व आलफ. हे आशा. १३ जंजिरेकर हवशी. - - [ लेखांक ३३७] - दिलपाक दिलदर्या इलाही मेहेरबान – खान मुक्काम जंजिरा उमर ताजा व दौलत ज्यादा यांस:- अजीद्वागोये द्वाअंकी येथील खैरसल्ला जाणवून आपला खैरसला कलमी करीत असले पाहिजे. दिगर मेहेरबानगीचे नजरेनें किताबत पाठविली ते खुशवक्त पोहोंचून दिल आराम जाहलें. ऐसेच हरघडीं खत किताबत पाठवून फकिराचे खबर घेत असले पाहिजे. आह्मी द्वा- गीर असो. किताबत आली तेथें कलमीं केलें जे, घामधुमीचे सबवेनें परशरामचे ठिकाणींहून वरघार्टी गेलियास पांच वर्षे होऊं आली. अलबता ठिकाणचे ठिकाण यावयाचा इरादा आहे ह्मणून विनायक जोशी व कृष्णशेट शेटये कर्यात चिपळून यांचे जबानीवरून पैगाम १. छ० १४ सुभा आर्बेन इ० : -- ता० ३ जानेवारी इ० स० १७४०.