पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ आहे. ह्या प्रसंगाची त्याची भाषा आणि त्याचे विचार फारच शोभायमान दिसतात. या वर्णनांत असा कांहीं चमत्कार आहे कीं, हें वाचतांना अंतःक रणास महापूर येऊन ते ब्रह्मानंदांत पोहत आहे की काय असे वाटतें ही हुबेहूब उभी केलेली तसबीर अगदर्दी साधी, भव्य, छानदार आणि मोठे थाटमाटाची आहे. या विद्वान् कारागिराचे परिश्रम या स्थळीं उत्तम सफळ झाले आहेत. या वर्णनांत खोट्यानाट्या गप्पा, अतिशयोक्त्या किंवा मोठे रूपकालंकार वगैरे घातलेले नाहींत. गुरूनें शिप्यास केलेला बोध अपूर्व वैराग्यजनक, संकलित आणि मनांत बाणून जाण्यासारखा आहे. तो अद्भुतरसानें ओतप्रोत भरला आहे. तरी हा उपदेश अगदीं खरा आहे असें मानून तो स्वीकारण्यास मन अगदीं आशंकत नाहीं. " ( बाजीराव बलाळ पेशवे ह्यांचें चरित्र ) ह्यावरून रा० सा० बापट ह्यांनी लिहिलेले " महापुरुषाचें " वर्णन अगदीं यथार्थ, साधार आणि सत्य आहे, व त्यांत “खोट्यानाट्या गप्पा" वगैरे कांहीं नाहींत, असा त्या वेळीं लोकसमज झाला होता, असें दिसून येते. परंतु ऐतिहा- सिक सत्याच्या कसोटीस जर हें वर्णन आतां लाविलें, तर तें केवळ कल्पनादे- वीच्या प्रसादाचें फळ आहे, असें निःपक्षपातबुद्धीनें पाहणारास तेव्हांच कळून येईल. रा० सा० बापट ह्यांना अस्सल कागदपत्र उपलब्ध न झाल्यामुळे, त्यांनीं दिलेलें ब्रह्मेद्रस्वामीचें व त्यांच्या मठाचें वर्णन, वस्तुस्थितीहून अगदी भिन्न अ सून, इतिहासदृष्ट्या त्यांत अनेक दोष झालेले आहेत. परंतु मराठ्यांच्या इतिहा- साची साधनें उपलब्ध होण्यापूर्वी हा ग्रंथ लिहिलेला आहे, एवढें लक्षांत ठेविलें म्हणजे ग्रंथकारास दूषण देण्याचे कारण राहत नाहीं. रा० सा० बापट ह्यांनी ह्या भागाच्या शेवटीं, " हे सारे कागदपत्र गोळा करून त्यांचें एक पुस्तक करून, छापवून, राखून ठेवण्याचे श्रेय कोणी एकादा स्वदेशभक्त घेईल, तर त्याचे लोकांवर बहुत बहुत उपकार होतील.” अशी सूचना केली आहे. ह्यावरून अस्सल कागदपत्र त्यांना मुळींच उपलब्ध झाले नव्हते, हे उघड होतें. ग्रांटडफ साहेबांच्या इतिहासांत ब्रह्मेद्रस्वामींच्या व पेशव्यांच्या पत्रव्यवहारां- तील आलेले स्फुट उल्लेख, थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या चरित्रांतील पुरुषा” विषयींचे दोन भाग, आणि काव्येतिहाससंग्रहांतीलं पेशव्यांची "महा- स्वामींस