पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैशापरी पैशे गेले, जपून ठेवले असते तर आज ना उद्या कामी आले असते. मनाशी खूणगाठ बांधली, की आता परत असल्या भानगडीत पडायचं नाही, मग कोणी कितीही आशा लावू दे.

भोंदू डॉक्टर, वैदूबाबांपासून सावध रहा!
लक्षात ठेवा, की एचआयव्ही बरा करायची औषधं अजून निर्माण झालेली नाहीत. आपण वर्तमानपत्रात अनेक जाहिराती वाचतो, ज्या सुचवतात, की अमुक अमुक डॉक्टरकडे, हकीमकडे, साधूकडे एचआयव्ही बरा करायचं औषध आहे. या असल्या जाहिरातींना बळी पडू नका. त्या फसव्या जाहिराती आहेत. पैसे वाया जातील व काहीही उपयोग होणार नाही.

●●●

   

 दुसऱ्या दिवशी मंगलताई हॉस्पिटलात गेल्या. टीबीच्या गोळ्या (डॉट्स) सुरू केल्या. एक दिवसाआड हॉस्पिटलला जावं लागायचं. तरी बरं हॉस्पिटल जवळ होतं. डॉक्टरसमोर गोळ्या घ्यायला लागायच्या. पहिला आठवडा काही त्रास झाला नाही. पण दुसऱ्या आठवड्यात गोळी घेतली, की उलटूनच पडली. डॉक्टरांनी परत एक गोळी दिली. नाश्त्यानंतर गोळी खाल्ली तरी पोटात आग पडायची. चक्कर आल्यासारखं व्हायचं. डॉक्टर म्हणाले, "गोळी खाल्ली, की नंतर आइस्क्रीम खावा". ताई मनात म्हणाल्या, "माझ्या बापाचंच आइस्क्रीमचं दुकान आहे. तिथंच बसते दिवसभर.'

 डॉक्टरांनी तोंडाला बांधायला हिरवा कपडा दिला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्याबरोबर ताईंनी तोंडावरून तो हिरवा कपडा काढला. 141 म