पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जर एआरटी औषधं सुरू केली तर एचआयव्हीची प्रजननक्षमता खूपच कमी होते व हळूहळू रोगप्रतिकारशक्ती वाढते. एचआयव्हीचं शरीरातील प्रमाण कमी होतं. यात महत्त्वाची गोष्ट अशी, की दिवसाकाठी कोट्यवधी एचआयव्ही विषाणू जन्माला येऊ शकतात व मरतात. प्रत्येक एचआयव्ही विषाणू अंदाजे १.५ ते ३ दिवस जगतो. म्हणजे जर एआरटीची औषधं घेण्यास एक दिवस जरी राहून गेलं तरी ते महागात जातं कारण तो एका दिवसात कोट्यवधी पिल्लं जन्माला घालू शकतो.

जर नियमित न चुकता एआरटी गोळ्या घेतल्या तर गोळ्या सुरू केल्यापासून त्या व्यक्तीचं आयुष्य अंदाजे २५ वर्षांपर्यंत वाढू शकतं.

 लक्षात ठेवा, की औषधांचे दुष्परिणाम दिसले तरी दिलेली औषधं दररोज न चुकता घ्यायची. एकही गोळी चुकवायची नाही.

 जर गोळी चुकलीच तर डॉक्टरांचा सल्ला घ्या." काउन्सिलर ताई वारंवार सांगत होत्या,

पुढे म्हणाल्या, "गोळी घ्यायचं कसं लक्षात ठेवणार? गोळीची वेळ चुकवू नये म्हणून मोबाइल फोनचा अलार्म लावावा. एक किंवा दोन किंवा तीन अलार्म ५ मिनिटांच्या अंतरांनी लावा. जर मोबाइल नसेल तर घड्याळाचा अलार्म लावा.

 जर दररोज हिशोबासाठी डायरी ठेवत असाल तर आठवणीसाठी डायरीत गोळ्या घ्यायची नोंद करून ठेवा. जर आपल्या घरच्यांना आपल्या औषधांबद्दल माहीत असेल तर त्यांना ही आठवण करून यायला सांगा.

  एखादया दररोजच्या दिनचर्येचा आधारही घेता येतो. उदा., दररोज पूजा करत असाल तर पूजा झाली, की लगेच मोळी घ्यायची अशी सवय करा किंवा टीव्हीवरच्या संध्याकाळच्या बातम्यांची वेळ किंवा एखादा हाच संदेश