या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. लावून सोडलें ( क. १२५ ). " चतुर्भुज श्याममूर्ति । शंखचक्र ते शोभती। पीतांबर वैजयंती । रुळती गळां " अशा प्रकारचा देव मी पाहिला, पाहिला, असे एकनाथ द्विवार सांगतात; अशा देवास पाहिल्यावर भक्तही विदेही होऊन त्यास भेटला, दोघांची मिळणी होतांच देवभक्तभाव नाहीस झाला, नामाचा एकसारखा छंद घेतल्या, व कायावाचामनांमध्ये निश्चय पूर्णपणे वागविल्याने, एकाजनार्दनाचा देव अंकित झाला असे ते म्हणतात ( क. १२६ ). आज मी धन्य झालों, कारण मी हृदयांतच चतर्भज देवास पाहिले, असे एकनाथांनी म्हटले आहे (क्र. १२७), आतां भी जिकडे जाईन, तिकडे मला देवच दिसतो; जिकडे पाहीन, तिकडे देव पुढेच उभा आहे असे वाटते (क्र. १२८ ). गुरुरूपांजन डोळ्यांत घातल्याने आंत राम, बाहरे राम, जागृतीत राम, स्वप्नांत राम, सुषुप्तीत राम; अशी माझी स्थिति होऊन गेली (क्र. १२९). या देवास प्रावण कांहींच नसल्याने जेथें. तेथें देव उघडाच दिसून देव निलाजरासा वाटतो; देवाने पांढऱ्या डुकराचेही रूप घेतले आहे, अशी माझी खात्री पटली (क. १३२). या देवास बाहेर नेऊन घातले तरी घरी आल्याबरोबर तो पुनः घरांतच दिसतो ( क्र. १३३). घर सोडून परदेशास गेलो असतां देव माझ्या समागमेंच असतो; कड्यांकपाटांवर पहावें तिकडे देवाचेंच रूप दिसते ( क्र. १३४ ). सगळे मनच रामांत रंगून गेल्याने तें राममय होऊन गेलें, व पाहता पाहतां विश्व मावळून गेलें अशी स्थिति झाली आहे, असें एकनाथ म्हणतात ( क्र. १३६ ). दोराचा सर्प जसा · जिवंतही राहत नाही, व मरतही नाही, नसा देह असो वा नसो, त्याची आम्हांस किंमत नाहीं (क्र. १३८ ). जगन्नाथाच्या चरणी चित्त लागल्याने आतां सर्व त्रैलोक्यच आनंदाचे होऊन गेलें आहे (क्र. १३९). देवास मी पाहू गेलों तो मी देवरूपच होऊन ठेलों (क्र. १४२). आता मी देवाची पूजा करूं गेलो असतां माझचिमी पूजा केल्याप्रमाणे होणार आहे; पूजनाची सर्व उपकरणे म्हणजे अत्र, गंध, दीप वगैरे ही सर्व देवमयच होऊन गेली आहेत (क. १४३). आपली आपण पूजा करण्याची राहटी जोपर्यंत जगांत नाही, तोपर्यंत आपली आपण पूजा करणाऱ्या ज्ञान्यापेक्षा अज्ञानच बरा असे म्हणण्यास हरकत नाही ( क्र. १४४ ). आतां मीच आत्माराम झाल्याने मी परब्रह्मरूप बनलो आहे; मी एकट एकला असून आतां मला, आधिव्याधि, अगर उपाधि कांहींच उरल्या नाहीत (क. ११५). जे माझ्या दृष्टीस दिसते, तें तें परब्रह्मरूपच झाले आहे ( क्र. ११७ ). आठही दिशांस देव संपूर्ण