या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

។។ ५५ श्रीशिवराज-भूषण

-=-=-=

== = 1 =


-1- 1- 1 भूषण म्हणतो, ह्या दोनरक्षक भोंसले राजाच्या आश्रयास सत्कवींच सभा आहे. ह्याचे यश निंदारहित, पराक्रम दुष्टतारहित आहे. तसेच ह्याचे जवळ कारणावाचूनही पुष्कळ सैन्य आहे. ह्या शिवाजी राजाचा आनंद देखील अभिमानरहित आहे. (१५४) । उदा० ४ थे-कवित्त मनहरण, कीरति के ताजी करी बाजी चढ़ि लूट कीन्ही भई सब सन विनु बाजी बिजै पुरक । भूषन भनत भौंसिला भुवाल धाक ही सो धीर धरबी न फौज कुतुब के धुर की ॥ सिंह उदैभान बिन अमर सुजान बिन मान बिन कीन्ही साहिबी त्यौं दिलीपुर कीं । साहि सुव महाबाहु सिवाजी सलाह बिन कौन पातसाह की न पातसाही सुरकी ॥ ५५ ॥ घोडयावर बसून शिवाजीनें लूटमार केली तेव्हाँ विजापूरचे सर्व सैन्य अश्वरहित झाले; (किंवा बाजी हरली. अर्थात् पराभव पावले.) यामुळे शिवाजीच्या पार्टीत भर पडली. भूषण म्हणतो, भोंसले राजाच्या धाकानेच कुतुबशहाच्या किल्ल्यातील फौजेने दम धरला नाहीं. उदयभान सिंहगडावाँचून व अमरसिंह सुजानगडावचन केला; (अर्थात् सिंहगडचा सुभेदार उदयभानू व सुजानगडचा अमरसिंह हे मारले गेले, व दिल्लीश्वराचें आधिपत्य अपमानित केलें (दिल्लीपतीचे आधिपत्य झुगारून दिलें). शहाजीपुत्र महाबाहू शिवाजीशी मेळ-तडजोड न करतो कोणा बादशहाची बादशाही (राज्य) नाश पावली नाहीं ? (१५५) ३६ समासोक्ति-लक्षण, दोहा बरनन कीजै आन को, ज्ञान आन को होय ।। समासोक्ति भूषन कहत, कवि कोविद सब कोय ॥ १६॥ जेथे ज्या वस्तूचे वर्णन केले जाते, आणि बोध निराळ्याच वस्तूचा होतो तेथे ‘समासोक्ति अलंकार होतो. (१५६)