पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होते, जर आपले मन आनंदी असेल तेव्हा वाघासारखी ताकद आणि हरणासारखी चपळाई आपल्यात येते. शारीरीक फरकांशिवाय मुला मुलींमध्ये जाणीवपूर्वक काही भेदभाव निर्माण केले जातात. कपड, केस, शिक्षण, वर्तणूक, समाजाचं त्यांच्याशी वागणं हे सर्व सामाजीक आहे. नैसर्गिक नाही म्हणून तर हे भेदभाव कुटुंबात ,समाजात आणि देशात वेगवेगळे आहेत. जसेकी काही ठिकाणी मुलींचे केस लांब तर काही ठिकाणी कापलेले असतात, कानात घातलेले असते. गळ्यात माळ असते. काही कुटुंबात मुले घरातील कामे करतात तर काही ठिकाणी नाही करत. काही महीला ,फक्त घरात रहातात त्यांना बाहेर जावू दिले जात नाही. काही परीवारात महिलांना बुरखा घ्यायला लावतात. पण मोठ्या प्रमाणावर स्त्रीया बाहेरची सर्व कामे करतात. पुरुषासारखी बाजारहाटही करतात. प्रजननासाठी निसर्गाने मुला मुलींच्या शरीरात काही फरक केलाय, परंतू निसर्गाने मुला-मुलींमध्ये भेदभाव निर्माण करुन श्रेष्ठ, कनिष्ठ हा भेद निर्माण केला नाही. मुलगा-मुलगी ,स्त्री -पुरुष अशी जी परीभाषा समाजाने निर्माण केली आहे. त्यालाच म्हणतात सामाजीक