पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/136

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आमच्या मते हे भय आणि लज्जा यापासुन मुलींनी मुक्त होवुन आपल्या शरीराबरोबर | एक सुखद संवाद निर्माण केला पाहीजे. कोणताही ताण-तणाव त्यांच्यावर असता कामा नये. मुलींच्या साठी लैंगिकता समजणे अधिक गरजेचे आहे. कारण त्यांच्यावर लावण्यात आलेले पाहारे, त्यांच्या संदर्भात होणारी हिंसा ही लैंगिकतेशी संबधीत असते. ही हिंसा थांबवायला हवी असेल तर लैंगिकतेची समज आणि लैंगिक अधिकार मिळणे जरुरीचे आहे. | काही लोकांचे म्हणणे आहे की मुला-मुलीं सोबत लैंगिकतेची चर्चा केली तर मुले बिघडतील आणि लैंगिकदृष्टया अधिक सक्रीय होतील. पण हा विचार पूर्णपणे चूकीचा आहे. सत्य तर असे आहेकी लैंगिकते विषयी माहीती आणि समज वाढली तर त्यांचे वर्तन अधिक जबाबदारीचे असेल आणि ते निर्णय अधिक जबाबदारीने घेतील. चर्चा आणि माहिती घेण्यातच समनदारी आहे 130