पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/139

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेग असे शरीर संबंध ठेवून शरीराची भूक भागविण्यासाठी आणि आनंदासाठी संबंध केले जातात. इथे आपण हे समजून घेतले पाहीजे की. लैंगिक गरज माणसाच्या नियंत्रणात राहू शकते. लैंगिक इच्छा प्रबळ असेल पण आपण माणसे त्या इच्छेपेक्षा प्रबळ आहोत. आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतले पाहीजे की लैंगिकता का हवी आहे,कधी हवी आहे आणि कोणासोबत ? | या पुर्वीच आपण पाहीले आहे की या विषयावर वेग वेगळ्या माणसांची आवड, प्रवृत्ती, इच्छा वेगळी असु शकते. काही लोकांचे म्हणणे आहे की प्रेम ही गोष्ट वेगळी आहे, लैंगिकता ही गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या मते प्रत्येक लैंगिक संबंधामध्ये प्रेम आणि दोस्ती गरजेची नाही. किंवा प्रत्येक प्रेमाच्या नात्यात लैंगिक संबंध होणे गरजेचे नाही.आम्ही या विचारांचा आदर करतो.परंतु आमच्या मते तरुण वयात पावले जपुनच टाकावीत.थोडे वय झाल्यानंतर, अनुभव आल्यानंतर,परिपक्वता आल्यांनंतर विचार करुन जबाबदारी पुर्वक शरिरसंबंध ठेवा, आता नाही. हे वय चांगल्या आणि सुंदर भविष्याचा पाया घालण्याचे वय आहे, त्याची तुमच्यावर जबाबदारी आहे.मेहनत,धैर्य आणि आनंद यांचा मेळ बसविणे कठीण असते पण ते अशक्य नाही.आमच्या मते लैंगिक संबध हा सर्वात घनिष्ठ संबंध आहे.यामध्ये आपले शरिर आणि काही क्षणांसाठी आपलं सर्व काही आपल्या लैंगीक जोडीदारामध्ये 133