पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/36

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीभेवर ताबा ठेवणं खूप उपयोगी पडतं. बेलगाम जिभे विषयी रहीम म्हणालेत, रहीमन जिव्या बावरी, कह गयी स्वर्ग पाताल, आप तो कह भितर घुसी, जुती खात कपाल म्हणजे जीभ बोलून जाते आणि तोंडात लपून बसते आणि मार मात्र शरिराला खावा लागतो. म्हणून जरा जीभ सांभाळा. प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक परिस्थीतीत जीभेवर नियंत्रण ठेवा. कान दोन आहेत आणि जीभ एकच आहे, म्हणून जास्ती ऐका आणि कमी बोला. ऐकल्यावर विचार करा. मनाशी आधी बोला आणि मग तोंड उघडा. ४. आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि सकारात्मक दृष्टिकोन एक चांगली व्यक्ती होण्यासाठी स्वत: वर विश्वास असावा आणि स्वतः विषयी आदर असावा. मी आहेना, मी करु शकते अशी स्वत:ची एक सकारात्मक प्रतिमा स्वत: बनवा. इतरांपेक्षा स्वत:ला कमी नका समजू आणि इतरांनाही कमी समजू नका. स्वत:ला स्वत:चे कर्ते करविता समजा. आपली योग्यता आणि आपले कौशल्य, आपली हुनर समजुन घ्या. ___ 30