पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कारणांशिवाय जसा तुम्हाला राग येत नाही, तसंच त्यांच्या रागाला ही काही कारण असेल. एक रागात असेल, तर तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. दुतर्फी राग खतरनाक होतो. जर एका बाजूला आग लागली असेल तर दुस-या बाजूला पाण्याची आवश्यकता असते. जर तुमचे आई वडील तुमच्या भविष्याविषयी, सुरक्षेविषयी विचार करुन घाबरत असतील आणि तुम्हाला टोकाटोकाला रागवत असेल तर त्यांचा हेतू समजून घ्या. त्यांचं प्रेम, त्यांची भीती समजून घ्या. आपल्या सर्वांच्या वागण्याच्या मागचा हेतू महत्त्वाचा आहे. आम्ही काही गोष्टी करतो किंवा करत नाही ते मदत करण्यासाठी, इतरांच्या आनंदासाठी, दुस-यांच्या फायद्यासाठी की दुस-यांचे नुकसान करण्यासाठी, दुःख देण्यासाठी? ६. प्रभावी संवाद- कसं बोलायचं आणि कसं ऐकायचं. आपण सर्वजण सार्वजनिक प्राणी आहोत. आपण कुटुंबात, समाजात राहतो. आपले जीवन इतरांशी जोडलेले आहे, इतरांवर अवलंबून आहे. इतरांसोबतचे नाते आपले जीवन अधिक चांगले बनवते म्हणून आपल्या जीवनात संवादाला अधिक महत्व आहे. संवादाच्या माध्यमातून आपण आपले