पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुलींना समानाची अवहेलना सोसावी लागते. आपला समाज पुरुष सत्ताकआहे म्हणजेच पुरुषांचा बोलबाला आहे. मुलगे आणि पुरुष यांना महत्व, प्रेम, संधी आणि साधनं दिली जातात, मुलींना पुरेसे जेवण, प्रेम, स्वातंत्र्य नाही. त्या आपल्या मनाप्रमाणे शिकू शकत नाही, घराबाहेर पडू शकत नाही. लग्न करु शकत नाही. या सगळ्या कारणांमुळे २००५-०६च्या NFHS च्या अहवाला मध्ये असे म्हटले की भारतात ५-१९ वयोगटातील ५६% मुलींच्या रक्तामध्ये अनिमिया आहे. बालविवाह बेकायदेशिर आणि गुन्हा आहे. तरीही २०-२४ वयोगटातील युवतींनी सांगितले की, ४७% मुलींची लग्ने ही १८ वर्षापूर्वी झालेली आहेत. १८% मुली १८ वर्षा आधी आई बनल्या आहेत. म्हणजेच आपल्या देशातील लाखो तरुणीं मध्ये रक्ताची कमतरता आहे, शारीरीक दृष्ट्या कमकुवत आहे. मातृत्व त्यांच्यावर लादल जातं.त्यामुळे बाळंतपणा दरम्यान लाखो स्त्रिया मृत्युमुखी । पडतात. सर्व भयानक आकड्यांना जबाबदार आपली कुटुंब व्यवस्था, आपला समाज आणि आपले । सरकार आहेत. म्हणजेच आपण सर्वजण. ( =