पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/101

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. wwwwwwwwwww । गादीत मऊपणासाठी जे द्रव्य (कापूस वगैरे) भरावयाचे त्याच्याशी त्या कापडाची मैत्री असावी. जसे-कापूस भरलेल्या गादीला खारव्याचे कापड जसे अनुकूल असते, तसे इतर कापड नसते. यासाठी अनुकूल प्रकारचे कापड घेतले पाहिजे. __गादी एक माणसाला किंवा दोन माणसांला शेजारी शेजारी निजण्याजोगी पाहिजे असेल, तर त्या मानाने तिची रुंदी कमजास्त ठेविली पाहिजे. लांबी अर्थात् एकच असणार. निजणाऱ्या माणसाला सरळ पाय पसरून अर्धा फूट तरी गादी उरली पाहिजे आणि कुशीला निजून एक हात सरळ लांब पसरतां येईल इतकी तिची रुंदी पाहिजे. साधारणतः एका माणसाची गादी ६ फूट लांब व ३॥ फूट रुंद, आणि दोन माणसांची ६ फूट लांब व ५ फूट रुंद पाहिजे. गादीत ऊब येण्यासारखें द्रव्य भरले पाहिजे. अशी द्रव्ये म्हणजे कापूस, लोकर, पक्ष्यांचे पर, केस इ० होत. गादी भरण्याचे काम पिंजारी लोक करतात. गादीत भरण्याचे द्रव्य अगोदर पिंजून साफ केले पाहिजे. त्यांत गांठी किंवा केरकचरा राहता कामा नये. तें द्रव्य गादींत सगळीकडे सारखें भरले गेले पाहिजे. कोठे कमी किंवा ज्यास्त उपयोगी नाहीं; आणि ते चांगले ठासून भरलेले असले पाहिजे; नाही तर गादी लवकर पातळ होते. गादीला टाके निदान तीन तीन इंच अंतरावर तरी पाहिजेत. एका माणसाच्या गादीची जाडी एक इंच पासून दीड इंच करण्याला रुई [ सरकी काढलेला कापूस ] ४ पासून ६ पक्के शेर पर्यंत व दोन माणसांच्या गादीला ६ पासून ९ शेरपर्यंत लागतो. गादी फार जाड करूं नये. फार जाड गादीवर निजावयाचे असेल, तर एकीवर एक दोन किंवा हव्या तितक्या गाद्या पाहिजे तशा घालाव्या.