पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें बरोबर रोगाची बीजे त्याच्या शरीरांत जाण्याचा संभव असतो. केर नाकातोंडांत गेला असतां ठसका लागतो. याचा अर्थ हाच की केर शरीरांत न राहूं देण्याचा शरीराचा प्रयत्न असतो. ७ शोभे करितां मांडून ठेवलेल्या वस्तु, चित्रे, झाडे वगैरे, खंड्यां-- वर ठेवलेले कपडे, व खाण्यापिण्याचे पदार्थ यांवर केर पडूं नये ह्मणून केर काढण्याचे अगोदर त्यांवर झांकणे घालावी. लोकरीची आसने, चर्मे वगैरे गुंडाळून ठेवून मग केर काढण्यास लागावें. ८ घर हमरस्त्यावर असेल तर बाहेरल्या ओसरीवरला केर काढतांना अंग चांगलें झांकून घ्यावे. लोकांना आपले अवयव उघडे दिसूं देऊं नयेत. ९ सकाळचा केर काढण्यापूर्वी घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ही चांगली उघडावी, ह्यणजे रात्रभर घरांत सांचलेली दूषित हवा बाहेर जाऊन बाहेरची स्वच्छ हवा आंत येईल व हवेची शद्धि होईल.केर काढतानां ती लावून घ्यावी व झाडण्याचे काम झाल्यावर पुनः उघडून द्यावी. १० झाडणे ह्मणजे नुसत्या भुईवरचा केर काढणे इतकाच अर्थ समजू नये. छत, भिंती, दारांच्या मागची जागा, खिडक्याच्या चौकटी, कपाटें, कोनाडे वगैरेतून जाळी होतात व केर बसतो. ह्मणून झाडतांना यांवरही हात फिरविला पाहिजे. भिंती, छत वगैरे झाडण्यास रोज वेळ न मिळाला तर निदान तिसऱ्या चौथ्या दिवशी तरी त्यांवरून हात फिरला पाहिजे. उंच जागेवरील केर काढण्यासाठी लांब दांड्याची एक केरसुणी निराळीच करून ठेवावी. ११ केर काढतांना सहज उचलतां येणाऱ्या वस्तु उचलून त्यांच्या खाली असलेला केर काढावा. कोपऱ्यांतून छत्र्या, जोडे,