पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/114

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १२ वें. १०९ wwwwwwwwwwwwwwwwww awraand मेंदीची पाने जवळ ठेविल्याने ही मच्छरें जवळ येत नाहीत असें ह्मणतात.(८)कीटिंग्ज पॉवडर किंवा लवंगाची पूड बिछान्यावर भुरभुरावी. - तांबड्या मुंग्या व मुंगळे विशेषतः पावसाळ्यांत घरभर होतात. त्यांच्यावर राख किंवा कापराची पूड टाकल्याने ते जातात. त्यांच्या आश्रयाची जागा पाहून काढून तेथेही कापराची पूड टाकावी. वाळवी किंवा उधई हा प्राणी कपड्यांचा, व कागदांचा फार नाश करणारा आहे. विशेषतः गरम लोकरी कपड्यांना याच्यापासून फार भीति आहे. ह्मणून कसर लागलेली जागा वरचेवर खरवडून, तीवर राकेल घालून ती जाळावी. घराची जमीन करतांना मातीत किंवा चुन्यांत सल्फेट ऑफ कॉपर नांवाचे द्रव्य घातल्याने या प्राण्याचा उपद्रव बिलकुल होत नाही. माशांचा उपद्रव दिवसास-विशेषतः पावसाळ्याच्या आरंभाला फार होतो. त्यांना खोलीतून घालवून देऊन दार बंद करावें, पडदे सोडावे, अंधार करावा, आणि इतक्याही बंदोबस्तांतून त्या आल्याच तर केसांच्या चवरीने त्या वाराव्या. काही चिकट पदार्थ लावलेले कागद ( Fly paper ) इंग्रजी औषधे विकणारांकडे मिळतात; त्याकडे माशा धाव घेतात, व त्यावर बसल्या ह्मणजे कागदावर चिकटून राहतात. त्या कागदांचा उपयोग करावा. बिछाने काढणे-यासंबंधांत पुढील गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत (१) माणूस निजून उठल्याबरोबर बिछाना काढूं नये. सगळ्या खिडक्या व दारे उघडून बिछान्यावरून मोकळी हवा थोडावेळ फिरकू दिल्यावर मग काढावा. (२) लहान मुलांनी हगून मुतून घाण केली असेल तर अगोदर मुलाला मोरीवर नेऊन त्याला स्वच्छ करावें, आणि मग ते वस्त्र हळूच काढून बाजूला ठेविल्यावर बाकीचा बिछाना गुंडाळावा. .......