पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/141

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें.. आतां प्रचारांतून जाऊन, त्या जागी साधे गोल किंवा पानाच्या आकाराचे डबे ठेवण्याची चाल पडली. अडकित्ता-हा लोखंडी, पितळी किंवा चांदीचाही करतात. तरी त्याचे पातें पक्क्या पोलादाचे असावे लागते. कित्येक पाती इतकी तीक्ष्ण असतात की, त्यांनी पैशाचेही तुकडे करता येतात. अडकित्ते सरळ, वांकलेले किंवा मोराच्या मानेसारखे असतात. ते लहानमोठे वाटेल त्या आकारांचे मिळतात. अलीकडे काफी दळण्याच्या यंत्रासारखी सुपारी बारीक दळण्याची यंत्रे निघाली आहेत. खराती (लेथ)वर धरूनही सुपाऱ्यांचे पातळ पापुद्रे काढतां येतात. कित्येक लोक खलबत्यांत घालून सुपारी कुटतात. अडकित्ते टेंभुरणी, तळेगांव, बुलढाणा, अलीगड वगैरे कित्येक ठिकाणी फार चांगले होतात, अशी प्रसिद्धि आहे. होळकरशाहीत रामपुरा जिल्ह्यांत खडावद्याचे अडकित्ते प्रसिद्ध आहेत. अडकित्त्याचा उपयोग सुपारी कातरण्याकडेच करावा. त्याने कात फोडूं नये. त्याने पात्याची धार बोथटते. त्याच्या आकाराच्या मानाने मोठी सुपारी फोडूं नये. तसे केल्यास त्याचे पातें वांकडे पडून, मग तें सुपारी कातरतांना बोटावर येते, किंवा पात्यास खांडे पडतात. स्वच्छता--विडयांची उपकरणी ह्मणजे तबक, डबा इ० ही नेहमी स्वच्छ ठेविली पाहिजेत. विशेषत: चुनाळे फार किटत असते. त्यामळे त्याचें झांकण लागेनासे होते, आणि मग चुना वाळून खराब होतो. यासाठी ते वरचेवर स्वच्छ करीत जावें. विड्याचें सामान. विड्याच्या सामानांत पाने, चुना, कात, सुपारी, व लवंग हे जिन्नस अवश्य; आणि वेलदोडे, खोबरें, बदाम, जायफळ, जायपत्री,