पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/167

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ घरांतली कामें. mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmraniranrmmarror फुलझाडांच्या कुंड्या मांडून किंवा तारांनी लटकावून जागेला शोभा आणितात. जशी जागेची सोय, पाण्याचा पुरवठा व यजमानाची व यजमानिणीची हौस असेल व अनुकूलता असेल त्याप्रमाणे बागेचें स्वरूप असते. कित्येकांना द्रव्याची अनुकूलता नसते. त्यामुळे हौस असून तिचा उपयोग होत नाही. कित्येकांना वाटते की, बागेची निगा राखण्यांत वेळ आणि पैसा लागेल. त्यामुळे त्यांची हौस कमी होते. पण बागेचे मुख्य साधन जागा व हौस ही आहेत. हौस ही स्वभावतःच पाहिजे. ती बाहेरून आणतां येत नाही. ती असली ह्मणजे तिच्यासाठी वेळ खर्चण्यास तो तयार होतो व आपल्या ऐपतीप्रमाणे काटकसरीने बागेच्या प्रीत्यर्थ थोडाबहुत पैसाही खुषीने खर्च करून, त्याच्या मोबदल्यांत सुखाचा लाभ करून घेतो. स्वतःला हौस नसली, तरी आपल्या कुटुंबांतल्या कित्येक माणसांना ती असते. त्यांच्या सुखासाठी तरी घराभोवती लहानशी बाग अवश्य करावी. वर जे बागेचे प्रकार सांगितले आहेत, त्यांचे स्थूलमानाने घरांतली बाग व घरास लागून असलेली बाग असे दोन वर्ग करता येतील. दुसऱ्या वर्गातच घरावेगळ्या स्वतंत्र बागेचा अंतर्भाव केला आहे. आतां या दोन वर्गासंबंधाने काय करता येण्यासारखे आहे, ते पाहूं. घरांतील बाग-हिच्यासाठी परस, पुढील चौक आणि पडवी किंवा सजा, अशा तीन जागा असतात. एखाद्या घराला तिन्हींची अनुकूलता असेल, कित्येक घरांला एक किंवा दोन्हींचीच अनुकूलता असेल. जशी अनुकूलता असेल, त्यामानाने त्या जागा उपयोगांत आणिल्या पाहिजेत. -परस-परसांत शेतखाना, गुरांचा गोठा, आड, स्नानगृह, तुलसीवृंदावन वगैरे अनेक गोष्टी असतात. मुलांच्या खेळण्या-बागड