पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/17

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ घरांतली कामें अंगच्या कुशलतेची व टापटिपीची परीक्षा व्हावयाची आहे हे लक्षात न ठेविल्यामुळे कित्येक बायका व मुली रांगोळी काढतांना कशातरी वाकड्यातिकड्या व बोजड रेघा काढतात. अशा रांगोळीने जागेला शोभा तर येत नाहींच, पण उलट ती कृति हास्यास्पद मात्र होते. ६ रांगोळी काढण्याचे काम फारसे कठीण आहे असे नाही. त्यांत थोडें मन घातले असतां व बोटांना संवय ठेविली असतां कोणालाही टिंबांच्या साह्याने रांगोळीच्या छानदार आकृति काढतां येण्यासारख्या आहेत. पूर्वी बायकांना ड्राइंगचे (चित्रकलेचे) प्राथमिक शिक्षण देण्याची उत्कृष्ट व्यवस्था या रांगोळी काढण्याच्या योगाने होत असे. ज्यांना हाताने नीट आकृति काढतां येणार नाहीत, त्यांनी रांगोळीचे छाप टीनच्या पत्र्याचे केलेले असतात, त्यांचा वाटेल तर उपयोग करावा. पारशी लोकांत दारासमोर रांगोळीचे हे छाप उठविण्याची चाल आहे.. प्रकरण ४ थे. सडासंमार्जन. १ सडा घालणे याचा सामान्य अर्थ 'एखादा जिन्नस चोहोकडे पसरून टाकणे' असा आहे. त्याचा विशेष अर्थ शेण व माती पाण्यांत कालवून ते मिश्रण जमिनीवर शिंपडणे असा आहे. हा सडा सकाळचे वेळी दाराबाहेर व अंगणांत घालण्याची चाल आहे. २ घरांत जाण्यायेण्याच्या रस्त्यावर व अंगणांत माणसांची वर्दळ फार असल्यामुळे ती जागा नेहमी उखळते आणि वाईट दिसते. तिच्यावरून केर उडून वाऱ्याने घरांत येतो. याचा बंदोबस्त व्हावा व त्या जागेवरली माती तेथेंच दबलेली रहावी आणि घराची जागा