पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/179

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ घरांतली कामें. घालू नये. पण अंगावरून खरारा करून ब्रश फिरवावा. अंगास डाग पडला असेल तेवढा भाग धुऊन पुसावा. आठवड्यांतून एकदां हवेत सर्दी किंवा गरमी असेल त्यामानाने ऊन किंवा थंड पाण्याने तिला स्नान घालावें. गांवाचे काठी नदी किंवा ओढा असेल तर केव्हां केव्हां तिला वस्तीचे खाली नेऊन धुवावी. स्नान घातल्यावर तिचें सर्व अंग फडक्याने पुसावें. सर्दी लागू देऊ नये. तिच्या सडांचे सभोंवती, कानांच्या आंतल्या भागास, गळ्याच्या पोळीला वगैरे गोचिडी चिकटून बसून रक्तशोषण करीत असतात. त्या बारीक चिमट्याने धरून काढून माराव्या. सडा सभोंवतीं केस पुष्कळ असून ते निर्मळ राखतां येत नसतील तर कापून काढावे. मशीला उष्ण प्रदेशांत उष्ण काळांत दिवसांतून दोन वेळ आणि दुसरे काळांत एक वेळ थंड पाण्याने स्नान घालावें. तरटाचे तुकड्याने तिचे आंग चोळावें. तिचे केस फार वाढतात व ते राठ होतात. ह्मणून वर्षांतून तीन चार वेळ ते कापून काढावे. गुरांचे खाणे-गाय आणि म्हैस ही निसर्गतः चारा खाणारी जनावरे आहेत. चारा विपुल असला तर त्यांस दुसरें कांहीं नको. पण चारा नसला तर त्यांस दुसरे काहीही दिले तरी त्यापासून त्यांचे पोषण होत नाही, किंवा त्यांस समाधान वाटत नाही. तरी असें अनुभवास आले आहे की, चाऱ्याबरोबर दुसरे पदार्थ-पेंड, भुसा, भुशी वगैरे-त्यांस दिल्याने ती पुष्ट आणि अधिक दुधाळ होतात. ह्मणून चाऱ्याबरोबर हे दुसरे पदार्थ गुरांना चारीत असतात. सामान्यतः खालील पदार्थ गुरांच्या वैरणींत येतात. १ चारा-गवत, जोंधळ्यांचा कडबा, भूस, वगैरे. २ चुणी-चुरी, आणि धन्यांची भरड.