पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/183

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ घरांतली कामें. mmmmmmmmmmmmmmmmmmmm चुणी आणि भरडा-चुणी झणजे धान्यांचे कडदण. हे डाळींचें चांगले असते. त्यांत तुरीच्या डाळीचे कडदण दूध वाढविणारे आणि उडदांच्या डाळीचें शक्ति वाढविणारे आहे. गहूं, जव, बाजरी, मठ आणि कुळीथ यांचा भरडाही देतात. पेंड-सामान्यतः ज्या धान्यांचे तेल मनुष्याच्या खाण्यांत येते, त्या धान्यांची पेंड गुरांना चारतात. ज्या देशांत ज्या धान्याच्या तेलाचा अधिक प्रचार, त्या देशांत त्याच धान्याच्या पेंडेचा प्रचार असतो. आणखी ज्या धान्यांत जे गुण असतात, ते त्याच्या पेंडेंतही येतात. ह्या तत्त्वांवर कोणते देशांत कोणती पेंड चारतात आणि कोणत्या पेंडेचे काय गुण-दोष असतात, याची समज होण्यासारखी आहे. सामान्यतः भुईमुगाची पेंड फार गुणकारी असते. पण ती फार महाग पडते. हिच्या खाली तिळांची किंवा कारळीची पेंड आणि हिच्याखाली करडई, खसखस, जवस वगैरेंचा नंबर येतो. पेंड देशी घाण्यांतलीच गुरांच्या खाण्याजोगी असते. मिलमध्ये तेल काढून राहिलेली पेंड निरुपयोगी आहे. कारण, ती अगदीच सत्त्वहीन झालेली असते. पेंड ओली रसयुक्त एक-दोन दिवसांची इतकी शिळी द्यावी. ती ताजीतटकी, किंवा बुरसलेली व वाळून लाकूड झालेली देऊ नये. - पेंड चारतांना तोडून कडा फोडून पाण्यात भिजवून द्यावी. नुकत्याच फळलेल्या ( सगर्भ झालेल्या ) गाईस उष्ण पेंड दिली असतां गर्भपतनाची भीति असते. तसेंच नुकत्याच व्यालेल्या गाईला ती फार चारली असतां जुलाब होऊ लागतात, आणि तिच्या दुधांत देखील त्या खळीचा वास येऊ लागतो. तरी समधात खळ केव्हाही योग्य प्रमाणांत चारण्यास हरकत नाही. उष्ण खळीचा उपयोग शीत काळांत करणे योग्य आहे.