पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/19

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें असली तर तिच्या बाह्या कोपरापर्यंत वर कराव्या आणि ओचे वर सावरून घ्यावे. ६ मग एका भांड्यांत प्रथम माती पाण्यांत कालवावी, आणि मग त्यांत शेण मिळवावें. तें सारखे चांगले मिळविले गेलें ह्मणजे डाव्या हातांत त्या मिश्रणाने भरलेली तपेली घेऊन उजव्या हाताने त्याचा लांब शिबका मारीत जावें. सडा फार दाट घालू नये. तो सारखा घालीत जावें, मधून मधून कोरडी जागा राहूं देऊं नये. ७ सड्याकरितां माती घेणे ती तांबडी, किंवा पिवळी असावी. काळी चिकणमाती उपयोगी नाही. शेतांतली खत घातलेली माती घेऊ नये. मातीत खडे किंवा वाळू असू नये. रस्त्यावरली मातीही कामाची नाही. रानांतून आणिलेली माती चांगली. ८ शेण घ्यावयाचें तें घरच्या किंवा शेजारपाजारच्या गाईम्हशींचें घ्यावे. तें ताजे असावे. शिळे घेण्यापेक्षां वाळलेले घेणे चांगले. पातळ, वास येत असलेले, ज्यांत धान्याचे कण किंवा किडे असतील असें, किंवा घाणेरड्या जागेवरले घेऊ नये. घोड्याची लीद किंवा बकरीच्या लेंड्या घेऊ नये. । ९ सड्याकरितां पाणी घ्यावयाचें तें गोडे, खारें, ताजे, शिळे, केर पडलेलें कसेंही चालेल. मात्र तें धुण्याचे किंवा घाणेरड्या डबक्यांतलें किंवा मोरीतले कधी घेऊ नये. १० सड्याकरितां एखादा टिनाचा रुंद तोंडाचा डबा, लहानशी बादली (बालटी), किंवा मोठ्या तोंडाचे मडके निराळेंच करून ठेवावे. व सड्याचे काम झाल्यावर ते चांगले धुऊन स्वच्छ करून ठेवावें. स्वयंपाकाचे किंवा धुण्यापाण्याचे भांडे या कामी उपयोगांत आणू नये.