पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/205

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० घरांतली कामें, wwwwwwwwwww आणि त्याचा अभ्यास धडा तयार करण्यापुरताच त्यांचेकडून करविला पाहिजे. ह्या धड्यांतले शब्दज्ञान शाळेत देखील करून देतां येईल, अभ्यास मात्र घरीच केला पाहिजे. कधंद्याच्या दृष्टीने उपयोग–मुलें सांभाळण्याचे काम शिकणे धंद्याच्या दृष्टीनेही फायद्याचे आहे. कारण, सांप्रत आपल्यांत घरगुती पद्धतीने मुलें सांभाळणाऱ्या बाया ( नर्सेस किंवा गवरनेसिस) इतर देशांतल्याप्रमाणे मिळत नाहीत आणि त्यांची वाण तीव्रतेने भासूं लागली आहे. मुलें सांभाळणाऱ्या मोलकरणीला ४५ रु० दरमहा मिळतो. तोच पद्धतशीर रीतीने शिकलेल्या नर्सला, किंवा गवरनेसला, ४०/५० रु० पर्यंत मिळतो. यावरूनही या कामाची योग्यता व प्रतिष्ठा ही दिसून येतात. बाबा विषयाचा उपक्रम. मूल सांभाळण्याचे कामाचा संबंध मुलाच्या बाळपणाशी-पहिली सहा वर्षे-येतो. त्यांत पहिली दोन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. कारण, ह्या दोन वर्षांत तें मूल अनेक लहान लहान अवस्थान्तरें झपाट्याने आक्रमीत मनुष्यभावाला येते. ह्या दोन वर्षांत त्याची आश्चर्यकारक वाढ होते. ह्याच दोन वर्षांत त्याजवर दुखण्याचे टीप-१ खाली प्रत्येक अवस्थेचा काल आणि मर्यादा दिल्या आहेत, त्या सरासरीच्या आहेत. त्या प्रत्येक मुलाच्या अंगच्या शक्तीच्या आणि निरोगितेच्या तारतम्याप्रमाणे महिना दोन महिने पुढे मागे होत असतात. १ डिंभावस्था-पाठीवर नुसतें उताणे पडून राहणे, जन्मापासून दोन महिने. २ चलनावस्था-तिसरे महिन्यांत. ३ वलनावस्था--कुशीस वळणे, मान सांवरणे, मुठी बांधणे, दृष्टि स्थिर करणे, चवथे महिन्यांत. ह्या माहिन्यांत त्याच्या ज्ञानेंद्रियांचे उद्बोधन होतें.