पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. २३ कुंचा उष्टयांत उपयोगांत आणतां येतील, पण याच्या उलट मात्र करता येणार नाही. ३ स्वयंपाकघर आणि जेवणघर निरनिराळी स्वतंत्र असली तर जेवणघरांतून मंडळी उठून गेल्यावर चुलीकडील काम संपण्याची वाट न पाहतां उष्ट्याखर काट्याचे काम लागलीच करून टाकावें. ४ उष्टें फारवेळ पडले राहू देऊ नये. ते जेवण झाल्यावर लागलींच काढावें. तसे न केल्यास मांजर घरभर उष्टें पसरतें, आणि माशा, मुंग्या, मुंगळे, चिलटे वगैरेंची वाढ होऊन मनस्वी त्रास होतो. ५ जेवणाराचे कडेस राहिलेल्या अन्नाची, किंवा एखादें वाढलेले ताट जेवणारा न आल्यामुळे तसेंच राहिल्यास त्याची विल्हेवाट पूर्वी चूल पोतेयाचे प्रकरणांत सांगितल्या प्रमाणे लावावी. होईल तोपर्यंत जेवणारे माणूस पानावरून उठून जाण्यापूर्वीच हे काम करावे. कारण, नंतर ते अन्न उष्टयासारखे होते. * 5 ६ उष्टं काढण्याचे कामास लागण्यापूर्वी ओचे व पदर नीट खोवून घ्यावे. तसेंच पाण्याचा तांब्या, बादली ( बालटी), शेण व केरसुणी हे सामान पाहून तयार ठेवणेही अवश्य आहे ७ उष्टे काढण्याचे काम नेहमी ओंवळ्यानेच करतात. कारण, सुती लुगड्याचे सोंवळे उष्टयाचा स्पर्श झाल्यावर कायम राहत नाही. रेशमी किंवा तागाच्या सोंवळ्याने हे काम केले असतां तें सोंवळे विटाळत नाही हे खरे; तथापि तें 'जेवलेले' होते, आणि देवपूजेच्या किंवा श्राद्धापक्षाच्या वगैरे कामाला तें चालत नाही.

  • कडेस ठेवलेल्या अन्नावर जेवणाराचे पात्रांतून अन्नाचा अंश उडून किंवा जेवणाराचा चुकून स्पर्श होऊनही ते अन्न उष्टयासारखे होते.