पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/31

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ घरांतली कामें. करितां एकीकडे ठेवून पाणी पिण्याचे गलास, वाट्या, आणि ताटें सगळी मोरीवर उचलून ठेवावी. भुईवर अन्न सांडले असेल तेंही अर्थात् या अन्नांतच भरून घ्यावे. १५ वर सांगितल्याप्रमाणे उष्टं काढणे झाल्यावर शेण लावावयाचे. पोतेरें फिरवावयाचे, किंवा पाण्याने जागा धुऊन टाकावयाची असते. हे काम पूर्वीच्या चूलपोतेयासंबंधाच्या प्रकरणांत सांगितले आहे, त्याप्रमाणे करावें. प्रकरण ७ वें. भांडी घासणे. मनुष्याचे सगळे जीवन आणि आरोग्य अन्नपाण्याच्या शुद्धोवर आहे, आणि ती शुद्धता राखण्याला भांड्यांची शुद्धता राखणे फार अवश्य आहे. भांड्यांची शुद्धता ती वरचेवर नीट घासून पुसून निर्मळ ठेविली तरच राहते, नाही तर राहत नाही. कसाही चांगला उंची पदार्थ का असेना, तो कळकट भांड्यांत शिजविला किंवा नुसता कमज्यास्त वेळ ठेविला,तरी तो नासतो.केव्हां केव्हां तो खाल्ला असतां मळमळतें, वांती होते, किंवा दुसरा कांही अपाय होतो. ह्मणून भांडी नेहमी स्वच्छ निर्मळ ठेवावी. ती उपयोगांत आणण्याचे वेळी तर घासून पुसून स्वच्छ केलेली असलीच पाहिजेत. स्वयंपाकातली भांडी-स्वयंपाकांत वापरलेले भांडे घासल्या पुसल्या शिवाय तसेंच पुनःदुसऱ्या वेळी उपयोगात आणणे अगदी गैर आहे. कित्येक लोक कढया, तवा, वगैरे तळण्याची भाजण्याची भांडी तशीच ठेवून पुनःकाही वेळाने ती वापरतात. पण तसे करणे शुद्धतेच्या दृष्टीने चांगले नाही. तव्यावर पोळ्या किंवा चपात्या करून