पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९.३. ५५ (३) सोंवळे झणजे शुद्ध जागेत ठेविलेले पाणी पिण्यासाठी व स्वैपाकासाठी साठवून ठेविले असेल त्यास हव्या तशा कपड्यांसुद्धा किंवा अमंगळ हातापायांनी स्पर्श करूं नये, किंवा दिसेल ते भांडे स्वच्छ आहे की नाहीं तें न पाहतां त्यांत बुचकळू नये. (४) पाणी भरण्याची आणि साठवणाची भांडी रोज आंतून बाहेरून हात फिरवून स्वच्छ धूत जावी, आणि दुसरे तिसरे दिवशी घासून स्वच्छ करावी. (५) पिण्याचे व स्वैपाकाचे पाणी गाळून भरावें. गाळण्याचे फडके निर्मळ, पांढरे शुभ्र,जाड, घट्ट विणीचे पण मृदु असावें. हे फडके दूध, तूप इ० पदार्थ गाळण्याच्या किंवा भांडी वगैरे पुसण्याच्या उपयोगांत आणूं नये. पाणी गाळणे झाल्यावर फडके लागलेच उचलून, व त्यांतले पाणी पिळून टाकून, धूर नसेल अशा जागी वाळत घालावे. (६) पाण्याच्या सर्व भांड्यांवरून झांकणे घालावी. मोठ्या भांड्यांतून पाणी काढण्यासाठी एक स्वतंत्र भांडे केलेले असावें व त्याच्या बुडास माती लागणार नाही अशा जागी तें ठेविलेले असावें. (७) स्र्वैपाकाचे पाणी स्वैपाकघरांत, पिण्याचे पाणी बसण्याउठण्याचे जागे जवळ, आणि एरव्ही वापरण्याचे चौकांत किंवा मोरीजवळ ठेवावें. (८) भांड्यांतून पाणी काढतांना ते सांडते. असें सांडलेले पाणी जेव्हांचे तेव्हां निघून जाईल अशी तजवीज केलेली असावी. ह्मणजे भांड्यांपाशी खाली चिखल व्हावयाचा नाही, आणि मुंगळे, मच्छरें, वगैरेंचाही उपद्रव त्यांपासून होणार नाही.