पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/69

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. ठेवाव्या. या गोळ्या देवपूजेला उपयोगी पडत नाहीत; तरी लावण्यास उपयोगी पडतात. काही लोकांच्या घरी देवांस गंधगोळ्या लावण्याची चाल असते. या गोळ्या दुसरे दिवशी काढल्यावर एका डबीत घालून गंध लावण्यासाठी जपून ठेवाव्या व काम पडेल तेव्हां तबकडीत भिजत घालून उपयोगांत आणाव्या, वीरवैष्णव काळ्या गंधाची एकच उभी काडी लावून त्यावर केशरी गंधाचा किंवा इतर वर्णाच्या गंधाचा ठिपका देत असतात. परंतु काळ्या गंधासाठी कृष्णागरु किंवा कस्तुरी सर्वांना मिळण्यासारखी नसते. ह्मणून त्यांचे काम कोळशाने किंवा काळ्या जळक्या सुपारीनें भागविण्यात येते. जपमाळ गोमुखा वगैरे- गायत्री मंत्र किंवा दुसरा एखादा मंत्र जपण्यासाठी माळ आणि गोमुखी घेण्याची कित्येकांची रीत. असते. हे जपाचे काम संध्येबरोबर करावयाचा परिपाठ आपले घरी असला तर जपमाळ व गोमुखी याही एखाद्या पाटावर संध्येच्या सामानाबरोबर लावून ठेवाव्या. स्नानसंध्येनंतरचा व्यायाम-कित्येक स्नानसंध्येनंतर सूर्यनारायणाला नमस्कार घालतात, दंड काढतात, जोडी फिरवितात जप उघडपणे करूं नये असा नियम आहे. गायत्रीजप थोडा करावयाचा असतां हातांत जानवें धरून तो हात उपवस्त्रांत झांकून ठेवतात. गोमुखी बनातीची असते. तीवर शोभेसाठी रेशमी फुले किंवा सूर्यचंद्र, गाय, तुळशी, राधामुरलीधर इ. कशिद्याची चित्रे काढतात.कित्येक बायकाही एखादा मंत्राचा किंवा रामनामाचा जप करतात. पण तो नुसत्या माळेने. गोमुखी घेत नाहीत जपमाळ पदराखाली झांकून घेऊन करतात. त्या आपली माळ डबीत खंजी वर किंवा गळ्यांत घालून ठेवतात.