पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/83

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. wwwwwwwwwwwwwwwwwwwwww घरी केल्यास संसाराच्या नित्यखर्चात बरीच काटकसर त्यांना करून दाखवितां येईल; व शिवाय मोलकरणी एखादे वेळी मिळाल्या नाहीत, आणि पिठाची गिरणी गांवांत नसली,ह्मणजे पिठाची पडणारी अडचण त्यांना स्वतः ही कामे करून दूर करता येईल. दळणकाम-शिकावयाचें तें क्रमाक्रमाने शिकावें. ह्मणजे अगोदर डाळी करणे, भरडा करणे, जाड दळणे, व नंतर बारीक दळणे. आरंभी जातें लहान, व हलके आणि नंतर मोठे व जड घ्यावे. पहिल्याने जात्याच्या खुंट्याला फडकें बांधून ठेवावें, व हाताला संवय झाली आणि घट्टे पडले झणजे ते सोडून दळावे. पावशेर अध्या शेरापासून तो अडीच तीनशेर पर्यंत एका बैठकीला दळण्याचा अभ्यास झाला ह्मणजे पुष्कळ झाला. दळण्याचे प्रकार दोन आहेत-१ दळणे व २भरडणे. दळण्यात पुनः जाड व बारीक, आणि भरडण्यांत डाळ करणे व भरडा करणे अस पोट प्रकार आहेत. दळण्याचे जातें जाड आणि तळीस तळी चिकटलला असे असते. भरडण्याचे जातें हलके असून त्याच्या तळ्यात फट असते. भरडण्याला वैरण ज्यास्त घालून खुंटा वर शेंड्याकडील बाजूस धरून अंमळ लवकर फिरवावा लागतो. दळण्याला वैरण अंमळ कमी घालून खंटा मध्यावर धरून अंमळ सावकाश ओढावयाचा असतो. दळण्याचे जातें भुईत पक्के रोविले नसेल तर ते तात्पुरतें रोवून घ्यावे. जात्याला कचित् खाली मातीचे पाळे लावावे लागते. तें लाविल्याने पीठ उडण्याचे कमी होते. जात्याचा खिळा, खुंटा, व माखणी ( माणी ) ही मजबूत व तळांत याग्य प्रमाणाने बसविलेली असावी. जात्याचा दगड पक्का असावा, १ही पकया लाकडाची केलेली नसली तर ती सुळते. खिळा तिच्या मधामध न येतां एका अंगाला कलता राहिला तर एखादे वेळी खिळ्याने ती चेपून फाटते.