पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. फरक. गाळण्यांत जिनसेचा बारीक भाग जितका काढून घेता येतो, तितका चाळणीने घेता येत नाही. चाळणी गाळण्याचे काम करते तसें निवडण्याचे ह्मणजे सुपाचंही करते. पण सूप जसे जिनसेची निवड तिच्या गुणावरून करते, तसे तिला करता येत नाही. उदा०---रवा किंवा सपीट यांच्या कणिकेतून चाळणीला सपीट काढून घेता येईल. तरी ते फडक्याने गाळून घेतल्याइतकें बारीक नसेल. चाळणी रव्यांतून जाडे बारीक प्रकार निरनिराळे करील; पण सारख्याच प्रकारच्या रव्यांतून तांबूस रवा, काळसर रवा वगैरे तिला वेंचून घेतां येणार नाही. हे काम सुपाने सहज करता येते. चाळणीचे दोन तीन प्रकार आहेत १ चाळणा_हा ढेकळे, खडे, काड्या, आणि गोल आकाराची धान्ये निवडून काढण्याच्या उपयोगाचा आहे. हा लोखंडी पत्र्याचा करून लाकडी चौकटीत बसविलेला असतो. धान्यांचे पल्लेचे पल्ले चाळावयाचे असतात, किंवा सडकेवरील गिट्टींतून माती, रेती, वगैरे वेगळी करावयाची असतात, तेथे हे काम चाळणे करतात. २ कणिकेची चाळणी-ही बहुधा पितळेची, गोल आकाराची व लहान गोल भोंकांची केलेली असते. या चाळणीने पदार्थांचे गुणदोष निवडले जातात. ती कणिकेंतली टरफलें व सबंध दाणे निवडून काढते. सबंध दाण्यांतून चुरी, बारीक रेती, व खडे वगैरे काढण्याचे कामही ती करते. ३ रवा-सपीटाच्या चाळण्या- या आडव्याउभ्या तारा विणून केलेल्या असतात, आणि तारांची जाळी ढिली पडूं नये ह्मणून त्यांच्या खाली एकेक तार आडवी व उभी घातलेली असते. हिच्या भोंवतीं कठडा लांकडाचा, टिनाचा किंवा पितळेचाही असतो.