पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/99

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामे. प्रकरण बारावें. बिछाने बालणे व काढणे. हे काम दिसण्यांत अगदी क्षुल्लक दिसते, पण खरोखर तसे तें सोपे नाही. बिछाना आरोग्याच्या व काटकसरीच्या दृष्टीने कसा असावा, तो कसा घालावा व कसा काढावा, ते कळल्यावांचून त्यापासून जितकें सुख मनुष्यास लागावयाचे तितकें लागणार नाही.' बिछान्याचे सामान---यांत अंथरूण, पांघरूण, पलंग, मच्छरदाणी, चादर व पलंगपोस वगैरे वस्तु येतात. यांतल्या पहिल्या दोन वस्तु अवश्यक आहेत. बाकीच्या तीन अवश्यक नाहीत. अंथरूण.. (१) यांत सतरंजी, गादी, उशो, चादर, आणि उशीचा अभ्रा इतक्या गोष्टी येतात. यांत सतरंजी मुख्य आहे. तिच्या पोटांत बाकीच्या वस्तु गुंडाळल्या जातात; ह्मणून ती चांगली ऐसपैस व पोताला दणगट असली पाहिजे. तिचे साधारण परिमाण गादीपेक्षा फूट दीड फूट अधिक लांब व सुमारे फूटभर अधिक रुंद असे आहे. सतरंज्या सुताच्या, रेशमाच्या किंवा गर्भरेशमी असतात. पहिली गरीब व सामान्य लोकांसाठी व दुसरी आणि तिसरी प्रत या श्रीमंतांसाठी आहेत. सतरंजी एका किंवा मिश्ररंगांची असते. कोणत्याही रंगाची असली तरी तो रंग पक्का पाहिजे. पांढऱ्या किंवा भडक रंगाची १ राम जेव्हां वनवासाला गेले, तेव्हां पहिल्याच मुक्कामाला लक्ष्मणाने राम व सीता यांच्यासाठी, तृण- पर्णीची शय्या रचून तयार केली होती. ही शय्या ह्मणजे उगाच चार पेंढया गवत किंवा गाठोडेंभर पाने पसरून केलेली नव्हती. तर ती इतकी चांगली व टिकाऊ होती की, पंधरा दिवसांनी भरत त्यांच्या भेटीला आला,तेव्हाही ती जशीची तशी होती. यावरून लक्ष्मणासारख्या राजपुत्राला ही शय्यारचनेची कला चांगली माहित होती असें अनुमान निघतें.