पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. हासिक पुरावा पुढे आणण्याचा किंवा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुराव्याचा भर मुख्यतः चार कागदपत्रांवर आहे; त्यापैकी एक पत्र जुनें सांप्रदायिक आहे; व दुसरीं तीन ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध कर तांना अलीकडे सांपडलेली आहेत. पहिले तुकारामाचें शिवाजीस ओवी- बद्ध पत्र; दुसरें शिवाजीचें सनदवजा रामदासांस पत्र; तिसरें शिवाजीच्या रामदासांशीं रायगडीं एकांतांत झालेल्या भेटीच्या उल्लेखाचें पत्र व शेव- टचें व रा. राजवाडे यांच्या मर्ती या वादाचें निर्णायक असे रामदासांच्या मरणानंतर लिहिलेले चाफळ मठांतील एक कच्चे टिपण. आतां या पत्रांचा क्रमानें विचार करूं. •तुकारामानें शिवाजीस लिहिलेले हें पत्र हनुमानस्वामींच्या बखरी- प्रमाणें शिवाजीस रामदासांचा अनुग्रह झाल्यानंतर बऱ्याच काळानें लिहिलेले आहे, असे बखरीवरून दिसतें. पत्रांतील खालील ओव्या- वरूनही ही गोष्ट स्पष्ट दिसते. सद्गुरु श्रीरामदासाचें भूषण । तेथें घाली मन चळो नको ॥ बहतां ठायीं वृत्ति चाळविली जेव्हां। रामदास्य तेव्हां घडे कैचें । राया छत्रपति ऐकावें वचन । रामदासी मन लावी वेगें । रामदासस्वामी सोयरा सज्जन । त्याशीं तनमन अर्पी बापा ॥ मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुज लागी ॥ परंतु तुकाराममहाराज सन १६४९ फार तर १६५१. मध्यें वैकुंठ- वासी झाले असें ऐतिहासिक पुराव्यावरून ठरले आहे. तेव्हां हैं पत्र तुकारामांनी लिहिलेले दिसत नाहीं. तुकारामांच्या हयातींत हे पत्र खरो- खरी लिहिलेले आहे असे मानल्यास रामदास व शिवाजीची भेट सन १६४९ पूर्वीच पुष्कळ काळ झाली असली पाहिजे, असें अनुमान करावें लागतें. सारांश हें पत्र सांप्रदायिक हकीगततीलच असल्यामुळे भेटीच्या काल- निर्णयाच्या वादांत स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा हाणून ग्राह्य धरतां येत नाहीं. आतां शिवाजीच्या सनदवजा पत्राकडे वळूं. त्यांतील या वादासंबंधाचा मजकूर असा आहे.