पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० सज्जनगड व समर्थ रामदास. मठस्थापनेचें विधान असा सरळ अर्थ लागतो. पण 'तेही ' चा 'तेव्हां असा अर्थ करून निकटवास घडण्याकरितां चाफळास रामदास- स्वामींनीं शिवाजीच्या विनंतिवरून मठ स्थापना केली असा रा. देव अर्थ करतात. परंतु असा अर्थ केल्यास 'निकट' या सापेक्ष शब्दाला अन्वर्थकत्व राहत नाहीं. व चाफळचा मठ स्थापन होण्यापूर्वी शिवाजीची व रामदासांची भेट झाली होती व त्यानें रामदासांस आपले सर्व राज्य अर्पण केलें होतें असा सांप्रदायिक हकीकतीचेही पलीकडे जाणारा विचित्र अर्थ निष्पन्न होतो. सारांश या पत्राचा शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीच्या कालनिर्णयाला काडीचाही उपयोग नाहीं. रा. राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेले तिसरें पत्र याची हीच अवस्था आहे. शिवाजी व रामदासाची रायगडी राज्याभिषेक झाल्यावर एकांतीं भेट होते या उल्लेखावरून त्यांच्या प्रथम भेटीच्या कालनिर्णयाच्या प्रभावर कांहींच उजेड पडत नाहीं. रा. राजवाडे यांनी रामदासांच्या चरित्रांतील प्रसंगाचें जें टिपण छापले आहे तें अनुक्रमणिका वजा आहे. ती हकीकत हनुमानस्वामींनीं वर्णि- लेल्या दंतकथांच्या हकीकतीशीं बहुतेक तंतोतंत जुळते. यावरून हनुमान- स्वामींनी आपले रामदासांचें चरित्र लिहितांना ज्या पूर्व चरित्रांचा उप- योग केला होता अशा एखाद्या चरित्राची हें टिपण अनुक्रमणिका असावें. रा. राजवाडे यांनी हें टिपण रामदासांच्या मरणानंतर थोड्याच दिवसांनी लिहिलेले आहे या गोष्टीवर बराच जोर दिला आहे. शिवाय ज्या अर्थी तें टिपण इतके जुनें आहे त्याअर्थी त्यांत दिलेले शक खरेच असले पाहिजेत व ज्या अर्थी हनुमान स्वामीनी दिलेला व या टिपणांत दिलेला काल अगदी तंतोतंत जमतो त्या अर्थी हनुमानस्वामींच्या बखरींतील काल हा ऐतिहासिक सत्य ठरतो; असें रा. राजवाडे यांनी कंठरवानें सांगितलें आहे. पण हैं टिपण चाफळ मठांतले आहे व त्यांत समर्थ सांप्रदायांत राम- दासासंबंधी प्रचलित असलेल्या सर्व दैवी चमत्कारांच्या अशक्य व असंभाव्य गोष्टींचा हनुमानस्वामींच्या बखरीप्रमाणेंच उल्लेख आहे. म्हणजे असत्योक्ति व अतिशयोक्ति हे दोष या टिपणावरही येतात. सारांश, हैं टिपण सांप्र-