पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. सज्जनगड व समर्थ रामदास. सन १६७२ पासून म्हणजे शिवाजीमहाराजांच्या आयुष्याच्या शेवटल्या आठ वर्षांत त्यांनी रामदासांची राजकीय कामांतही सल्लामसलत घेतली असेल, राज्यारोहाणाच्या बाबतीत तर अशी सल्लामसलत घेतली होती याला स्पष्ट दाखलाच आहे; तेव्हां ऐतिहासिक दृष्ट्या शिवाजीमहाराजांचा व समर्थ रामदासांचा प्रत्यक्ष संबंध दोघांच्या उतार वयांत घडून आला हैं उघड आहे. प्रत्यक्ष भेटीपूर्वी या दोघांनाही एकमेकांची ऐकून माहिती सन १६५८ पासून झाली होती हेंही तितकेंच उघड आहे. कारण १६५८ पासून शिवाजीनें चाफळच्या मठास दरसाल दोनशें होनांची भिक्षा दिली होती व ही गोष्ट समर्थांना त्यांच्या शिष्याकडून कळली असलीच पाहिजे. एव्हांपासून रामदासांच्या आध्यात्मिक कल्पनांना राज- कीय कल्पनांची जोड झाली असावी व त्याची छटा त्यांच्या कवनांत दिसूं येऊं लागली असावी हें पूर्वी दाखविले आहे. याप्रमाणे या वादाचा निकाल लागतो. व त्यांत असमाधान वाटण्या- सारखें कांहीं नाहीं. पण रामदास शिवाजीपेक्षां मोठे होते; रामदासांवांचून शिवाजीच्या हातून जें राष्ट्रीय कार्य झालें तें झालें नसतें अशी मनाची दृढ समजूत ज्यांनी करून घेतली आहे त्यांना हा निकाल पसंत पडत नाहीं. हल्लींच्या निकालावरून शिवाजीनें किंवा निदान शिवाजीच्या यशस्वी कार्याने रामदासांना राजकीय व व्यावहारिक कल्पना सुचल्या निदान त्यांचा कंठरवानें उपदेश करण्याची स्फूर्ति झाली व ह्मणून शिवाजी राम- दासांपेक्षा मोठे असे विधान कोणी केलें तर तें अगदींच चुकीचे ठरणार नाहीं. पण निरनिराळ्या व्यवसायांत आयुष्य घालविलेल्या विख्यात विभूर्ती- बद्दल एकापेक्षां दुसरा मोठा अशी तारतम्याची तुलना करणेंच चुकीचे आहे. त्या दोन्हीही विभूति आपआपल्या परी मोठ्याच होत असे म्हणणेंच रास्त आहे. रामदास शिवाजीपेक्षा मोठे किंवा शिवाजी रामदासांपेक्षां मोठे हा वाद गंगा यमुनेपेक्षा जास्त पवित्र किंवा यमुना गंगेपेक्षा जास्त पवित्र या उत्तर हिंदुस्थानांतील या नद्यांच्या महत्त्वासंबंधींच्या वादासारखा आहे. ( दूर- दूरच्या प्रांतांत गंगेस महत्त्व दिले गेलें आहे म्हणजे या पक्षापैकी एकाचा