पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. १२५ बारमाला ताजे सनदेचा उजुर न करणे छ १५ माहे रजवु सदरहू इना- माचे खटपटे करणे येक ब्राह्मण राजेश्री साहेबी हुजुरुन दिला आहे त्याचे सनद आलाहिदा चालिलि आहे तेणे प्रमाणे त्याचे वेतन सालायाचे सालायास निवळ पाठवित जाणे प|| हुजुर माते सुद ( ३ सप्टेंबर, सोमवार १६७७.) लेख नं. ५ श्री रघुनाथ सहस्रायु चिरंजीव भैरव भटासि प्रि (ति) पूर्वक दिवाकर गोसावी आसिर्वाद * चे (ते) थेचें वर्तमान ऐकिलें तेणें करून व्याकुलता बहु ताचे जालों उपाय तो कर्तव्य आमचे हातीं ये समई कांहींच नाहीं क्लेशी मात्र जालों क्षेम जालें ऐसे वर्तमान ये * (ईल.) तेव्हां स्वस्थता वाटेल आमचे शरीर * (तो) गळीत जाले आहे परंत आल्प मात्र वेथा बारे जाली आणी आह्नासाठी येऊ म्हणाल तरी वेथा बदल होईल ऐसें न करणे पुरते बरे होउ देणे हे आसिर्वाद हेच पत्री अनंत गोसावी याचा अनेक आसीर्वाद पूर्वी कैलासवासी सीवाजी राजे भोसले यासी परिधावी संवत्सरी शिंगणवाडीचे मटी श्री | हनुमंतासमोर परमार्थ झाला ते समई मंडळी होती ते स (म) ई रामचंद्र पंत अमात्य व दत्ताजी पंत वाकेनिवीस यानी सर्वास जो सांगीतला त्याचें स्मरण सर्वास देत जाणे उत्धव गोसावी यानी समर्था अज्ञेची अवज्ञा केली (ह्म) णुन कलो अलें तुझी समयी अज्ञेप्रमाणे राहटी करणे हे असिर्वाद