पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०

सज्जनगड व समर्थ रामदास.

होते. १६७३ मध्ये शिवाजी महाराजानीं प्रथमतः परळीचा किल्ला सर केला; नंतर सातारच्या किल्ल्याला वेढा देऊन तोही किल्ला सर केला.
 शिवाजीच्या मरणानंतर औरंगझेबाने मराठ्यांचें राज्य काबीज करण्या- कारतां भगीरथ प्रयत्न केले त्यांमध्ये १७८० सालीं त्याने हे किल्ले काबीज केले व त्यांना अजिमतारा व नौरसतारा अशीं नवीं नांवें ठेविलीं. परंतु औरंगझेबाच्या दुसन्या नांवाप्रमाणेच तीं त्याच्या पश्चात् लुप्तप्राय झाली. शाहु महाराज महाराष्ट्रांत परत आल्यावर हे दोन्ही किल्ले परत मरा- ठ्यांच्या ताब्यांत आले व मराठेशाहीचा शेवट होईपर्यंत ते त्यांच्याच ताब्यांत होते. १८१८ मध्ये हे दोन्ही किल्ले इंग्रजांच्या ताब्यांत आले.
 १६७३ मध्ये शिवाजीमहाराजानी हा किल्ला सर केल्यावर तो सातारा किल्ल्याच्या शेजारी आहे असें जाणून समर्थ रामदासस्वामी यांस रहा- वयास दिला व १६७३ पासून १६८१ पर्यंत म्हणजे आपल्या आयु- ष्याची शेवटचीं आठ वर्षे स्वामींनीं परळीच्या किल्ल्यावर काढली. तेव्हां- पासून त्याला सज्जनगड असें नांव पडलें. शिवाजीच्या पश्चात् संभाजीला रामदासांनी ज्या एका प्रसिद्ध पत्रानें उपदेश केला तें परळीसच लिहिलें व तेथूनच रवाना झालें. म्हणून व लगेच ' रामदासांचे महत्त्व व त्याचा दास- बोघांतील उपदेश' या विषयाचा विचार करावयाचा आहे त्याला योग्य उपक्रम हें पत्र आहे म्हणून तें पत्र येथे समग्रच देणें वावगे होणार नाहीं.

अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावें ।

तजवीज करीत बसावें । एकांत स्थळीं ॥ १ ॥

कांहीं उग्र स्थिति सोडावी । कांहीं सौम्यता ध. 
चिंता लागावी परावी । अन्तर्यामीं ॥ २ ॥

मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे ।

सुखी करून सोडावें