पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४

सज्जनगड व समर्थ रामदास.

दाखवून कै: रानड्यांनीं डफ-एलफिनस्टनचा 'मराठ्यांचा उदय म्हणजे वणवा' हा आक्षेप दूर केला.
 कै. माधवरावांचें हें मत महाराष्ट्रांतील कांहीं मराठ्यांच्या इतिहासा- च्या अभिमान्यांस पसंत पडलें नाहीं. त्यांचें म्हणणें असें कीं, रानड्यांनीं केलेली मराठ्यांच्या उदयाची मीमांसा बरोबर नाहीं. कै. रानडे हे स्वतः मोठे समाजसुधारक व प्रार्थनासमाजिष्ट असल्यामुळे व हल्लींच्या काळीं राजकीय सुधारणा होण्यापूर्वी सामाजिक व धार्मिक सुधारणा झाली पाहिजे असें त्यांचें मत असल्यामुळे या त्यांच्या मताचा व पूर्वग्रहाचा पगडा मराठ्यांच्या इतिहासाची मीमांसा करतांना त्यांच्या मनावरून दूर झाला नाहीं व म्हणून त्यांनी ही मीमांसा केली. बाकी खरें पाहूं जातां महा- राष्ट्रांतील संतमंडळीचा व त्यांच्या धार्मिक सामाजिक व विशेषतः भक्ति विषयक उपदेशाचा राजकीय प्रगतीस फारसा उपयोग झाला नाहीं; उलट त्यांच्या निवृत्तीपर, वैराग्यपर व सात्विक धर्मपर उपदेशाचा परिणाम लोकांना नेभळट व क्षात्रधर्मपराङ्मुख करण्यामध्येच झाला व म्हणून या संतमंडळीची राजकीय प्रगतींत एक प्रकारची आडकाठीच झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं व म्हणून हल्लींच्या काळींसुद्धां सामाजि धार्मिक सुधारणेचें घोडें पुढे दामटणें म्हणजे राजकीय प्रगतीस अड आणण्यासारखें आहे असें या पक्षाचें म्हणणें आहे. मात्र जरी पूर्वीचे सर्व संत व कवी यांना एकाच माळेंत घालून त्यांच्यावर निरुपयोगीपणाचा छाप मारण्यास हा पक्ष तयार आहे तरी पण त्याचे मतें रामदास मात्र गोष्टीला अपवाद आहे; त्याची शिकवण निवृत्तिपर नाहीं; त्यानें वैराग्या स्तोम माजविलें नाहीं; त्यानें जातिभेदावर तडाके उडविले नाहीत; उल त्याने क्षात्रधर्माचा उपदेश केला; त्यानें राष्ट्रीय भावना उद्भूत केली त्यानें प्रपंचाचें महत्व दाखविलें; त्यानें दैववादाचा नाश करून प्रयत्ने वाढविला, त्यानें लोकांत स्वाभिमान व देशाभिमान जागृत केला; त प्रवृत्तिमार्ग स्थापन केला, त्यानें लोकांचा नेभळटपणा काढून टाक त्यांना सामर्थ्यवान् केलें; अर्थात् रामदास हा महाराष्ट्राचा मुत्सद्दी, राष्ट्राचा राष्ट्रकर्ता, महाराष्ट्राचा राजकीय गुरू, महाराष्ट्रांत नव