पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ सज्जनगड व समर्थ रामदास. आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हे निरूपण । आळसे परमार्थाची खूण | मलिन जाहली || आळसें नित्य नेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला । आळसें आळस वाढला । असंभाव्य | आळसें गेली धारणाधृति । आळसें मलिन झाली वृत्ती । आळसें विवेकाची गति । मंद जाहली || ओळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली | आळसें शून्याकार झाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥ दुश्चितपणा सर्वे आळस । आळसे निद्राविलास । निद्रा विलासें केवळ नाश | आयुष्याचा || निद्रा आळस दुश्चितपण । हेंचि मूर्खाचें लक्षण | येणें करितां निरूपण | उमजेचिना ॥” सातव्या व आठव्या समासांत रामदासानीं पुनः बद्ध मोक्ष, परमात्मा व जीवात्मा, नवविधा भक्तीपैकी आत्मनिवेदन व सायुज्यमुक्ति वगैरेबद्दल निरूपण केले आहे. त्यांत राज्याची व सैन्याची उपमा ध्यानांत धरण्या- सारखी आहे. एक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं । मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ मायेसि होईल कल्पांत । अथवा देहास होईस अंत । ते काळी पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान i समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ सैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें । सैन्य असतांच राज्य करावें । हें कळेना ॥ माया असोनीच नाहीं । देह असतांच विदेही । ऐसें समाधान काहीं । वोळखावें || राज्यपद हातासि आलें । मग परिवारें काय केलें । परिवार देखतां राज्य गेलें । हें तो घडेना ॥