पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ३९ नवव्या समासांत सिद्ध व साधु यांचें लक्षण सांगितले आहे व त्या समासाचे शेवटीं तुकारामाप्रमाणें आपल्या नांवाचा ओवीचे शेवटीं उल्लेख केला आहे. " रामदास म्हणे श्रोतीं । अवधान द्यावें ॥ दहाव्या समासांत सद्गतीकरितां व मोक्षाकरितां लोक नाना उपाय व मार्ग सांगतात त्यांचा उल्लेख असून शेवटीं स्वानुभवानें मिळविलेला ज्ञान- मार्गच खरा असा रामदासांनीं निश्चय केला आहे. हा आठवा दशक स्वतंत्र म्हणून लिहिल्यासारखा दिसतो व त्याला ज्ञानदशक असें नांव दिलेले असावें असें खालील उपसंहारावरून वाटतें. आपण वस्तु मुळीं एक । ऐसा ज्ञानाचा विवेक । येथून ज्ञानदशक | संपूर्ण जाहला ॥ आत्मज्ञान निरूपिलें । यथामतीनें बोलिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ६ न वव्या दशकाच्या पहिल्या समासांत ब्रह्माला जी गुण- रहित्वासंबंधीं नकारार्थी विशेषणें- जसे निराभास अतर्क्स, निरंजन, निःसंग-लावतात त्यांचा अर्थ काय असा शिष्यानें प्रश्न विचारला असून त्याची व्युत्पत्ती- रूपाने उत्तरें दिली आहेत. पुन्हां दुसऱ्या तिसऱ्या समासांत रामदासांनी देवाच्या स्वरूपाचें व ज्ञान्याच्या स्थितीचें विवरण केले आहे व तसें कर- तांना लोकांच्या प्रचालित कल्पनेवर तडाका मारला आहे. 'देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण । पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥ देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला । परंतु बहुविध झाला । हें तों घडेना ॥'