पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच न द्यावें । परपीडेवरी नसावें । अंतःकरण ।। लोक पारखून सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे । पुनः मेळवूनि घ्यावे । दुरिल्या दोरें ।। हिरवयास दूरी धरावें । कचरटासिन बोलावें | संबंध पडतां सांडूनि जावें । एकीकडे । ऐसें असे राजकारण | सांगतां तें असाधारण | सुचित असतां अंतःकरण | राजकारण जाणिजे ॥ वृक्षारूढास उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें | कारभाराचें सांगावें | अंग कैसें म्हणोनि || पाहतां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना । आलें वैभव अभिलापिना । कांहीं केल्या || एकाची पाठी राखणें । एकास देखों न शकणें । ऐसी नव्हत की लक्षणें । चातुर्याची ।। न्यायें बोलतांहि मानेना। हित तेंचि नये मना । येथें कांहींच चालेना । त्यागाविण ॥ शुद्ध नेटकें ल्याहावें । लिहोनि शुद्ध शोधावें । शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ।। विस्कळित मातृका नेमस्त कराव्या । धाष्टर्य जाणोनि सदृढ धराव्या । रंग राखोन भराव्या | नानाकथा || जाणावयाचें सांगतां नये । सांगायाचें नेमस्त नये । समजल्याविण कांहींच नये । कोणी एक ॥ हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण | वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ।। गुसों जाणें सांगों जाणे । अर्थातर करूं जाणे । सकळिकांचें राखों जाणें । समाधान || ४५