पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें । आपला मगज राखणें । कांहीं तरी ॥ हें प्रचीतीनें वोलिलें । आधीं केलें मग सांगितलें । मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणी एकें । महंतें महंत करावे | युक्ति बुद्धीनें भरावे । जाणते करीत विचरावे | नाना देशीं ॥ बाराव्या दशकाच्या पहिल्या समासांत रामदासांनी प्रपंच आणि पर मार्थ यांची सांगड घातली आहे; व प्रपंचाशिवाय परमार्थ साधणार नाहीं असेंहि म्हटले आहे. प्रपंच व संसार हे शब्द एकाच अर्थी योजले आहेत असे वाटतें. रामदासांच्या अभिमान्यांच्या मतें संसार व प्रपंच यांत राम- दासांनी अत्यंत भेद मानला आहे. प्रपंच म्हणजे राष्ट्रप्रपंच किंवा व्यक्ति- प्रपंच व संसार म्हणजे बायकामुलें. अशा तऱ्हेचा हा फरक आहे असें त्यांचे म्हणणे आहे पण ती या समासावरून उगाच क्लिष्ट कल्पना आहे असें हाणावें लागतें. आधीं प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थ विवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ प्रपंच सोडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ।। प्रपंच सोडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ संसारी असतां मुक्त । तोचि जाणावा सुयुक्त | आखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे || प्रपंचीं जो सावधान । तो परमार्थ करील जाण । प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ॥ ह्मणोन सावधानपणें । प्रपंच परमार्थ चालविणें । ऐसें न करितां भोगणें । नाना दुःखें ।। परनारी पाहोन उचंबळे । जीव सृष्टि विवेकें चाले । आणि पुरुष होऊन भ्रमले। यासि काय म्हणावें ॥ स...४