पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. सातव्या समासापासून दशकाच्या शेवटपर्यंत निवळ आध्यात्मिक विषयांचें प्रतिपादन रामदासांनी केले आहे. सातव्यांत विवेकानें खन्या कर्त्यास ओळखावे असे सांगून आठव्यांत खरा कर्ता कोण या प्रश्नाचे उत्तर दिलें आहे, व तें देतांना लोकांमध्यें प्रचलित असलेल्या हजारों देवांच्या कल्प- नांचा उल्लेख केला आहे; व खरा कर्ता म्हणजे कोणीच नाहीं; परब्रह्म हें निर्गुण आहे असे विवरण केले आहे. नवव्या समासांत देहाच्या ठिकाणी सुखदुःख भोक्ता म्हणजे आत्मा होय असे सांगितले आहे. शेवट च्या समासांत जरी सर्व वस्तुजात परब्रह्मापासून झालेली आहे तरी व्याव- हारिक रीतीनें चांगले वाईट असा फरक आहे व तसा फरक केला पाहिजे व म्हणूनच मनुष्यानें आपल्यामध्ये गुण आणण्याचा प्रयत्न करावा व निंद्य असेल तें टाकून द्यावे असे सांगून समास व दशक संपविला आहे. एका उदकें सकळ झालें । परी पाहोन पाहिजे सेविलें । सगट अवघेंचि सेविलें । तरी तें मूर्खपण || जीवनाचें झालें अन्न | अन्नाचें झालें वमन । परी वमनाचें भोजन | करितां नये ॥ ५२ तैसें निंद्य सोडूनि द्यावें । वंद्य तें हृदयीं धरावें । सत्कीर्तीने भरावें । भूमंडळ | उत्तमास उत्तम माने । कनिष्ठास तें न माने । म्हणोन करंटे देवानें । करून ठेविले ॥ सांडा अवघें करंटपण। धरावें उत्तम लक्षण | हरिकथा पुराण श्रवण | नीतिन्यायें || वर्तायाचा विवेक । राजी राखणें सकळ लोक । हळुहळु पुण्यश्लोक | करित जावें ॥ मुलांचे चालीनें चालावें । मुलांच्या मनोगतें बोलावें । तैसें जनास शिकवावें । हळुहळू ।। मुख्य मनोगत राखणें । ह्रीं चातुर्याची लक्षणें । चतुर तो चतुरंग जाणें । इतर ते वेडे ।।