पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ५९. सोळावा दशक चवदाव्याप्रमाणेंच अपूर्व आहे. यामध्यें पंचमहाभूतांचें- प्रत्येक समासांत एकएका भूताचें या- प्रमाणें-स्तवन केलेले आहे. यामधल्या कांहीं कांही HUN कल्पना कविकल्पकतेला अनुरूप अशा आहेत. यामध्यें रामदासांचा नेहमीचा वेदांतही फारसा आला नाहीं; किंवा नैतिक व्यावहारिक उपदेशही फारसा दृष्टीस पडत नाहीं. तर यांत कविप्रतिभेनें केलेले सृष्टी- तत्त्वांचें निरपेक्ष वर्णन आहे. यामुळे काव्यमय कवितेच्या तोडीला बस विण्यास योग्य अशा या दशकांतल्या पुष्कळ कविता आहेत. यामुळे हा सर्व दशक वाचनीय झालेला आहे. पहिल्या समासांत वाल्मीकी कवीचें स्तुतीपर नमन आहे. रामदासाचा प्रिय देव राम याचें चरित्र गाणारा वाल्मीकी कवी महाभारताच्या कर्त्या व्यास कवीपेक्षां रामदासाला जास्त सन्मानार्ह वाटावा हें स्वाभाविक आहे. या समासांत वाल्मीकी ऋषि प्रथमतः वाल्ह्या कोळी असून तपोबलानें वाल्मीकी ऋपि झाला. त्यानें रामचरित्र रामाच्या बालपणीच कसे पुरे केलें, तो तप करीत असतांना त्याच्या आसनावर मुंग्यांनीं वारुळ केल्या- मुळे त्याला वाल्मीकी असें नांव कसें पड़लें, वाल्मीकी रामनामानें पापा. पासून कसा तरला वगैरे सर्व दंतकथा या समासांत रामदासांनी एकत्र गोंविल्या आहेत. दुसऱ्या समासांत सूर्याची स्तुति आहे. त्यांत सूर्यप्रकाशावर सर्व जगाचे व्यवहार कसे अवलंबून आहेत हैं चांगल्या तऱ्हेनें सांगितले आहे. त्याच प्रमाणें रामाचा वंश सूर्यापासून झाला आहे या पुराणांतील दंतकथेचाही उल्लेख केला आहे. करतात; तिसऱ्या समासांत पृथ्वीचें स्तवन केले आहे. सर्व प्राणिमात्राचा आ- धार पृथ्वीच होय; पृथ्वीवरच माणसें 'गड कोट पुरे पट्टणें ' पृथ्वीवर सर्व पर्वत समुद्र व दन्या खोरीं असतात, पृथ्वीपासून सर्व धातु