पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. मिळविण्यास नवविधा भक्ति व विशेषतः गुरुभक्ति व गुरुसेवा पाहिजे हेच रामदासी वेदांताचें शेवटलें तत्व होय. , सारांश, दासबोधांत महाराष्ट्र साधुसंतांनी महाराष्ट्र भाषेत वारंवार प्रतिपादन केलेला वेदांत; त्यांनी पुष्कळदां प्रतिपादन केलेली ज्ञान व भक्ति यांची जोड व संगति यांचेंच विवरण आहे व म्हणूनच रामदास व इतर मराठी साधुसंत मंडळी यांमध्यें आध्यात्मिक बाबतीत म्हणण्या- सारखा फरक नाहीं, मराठी साधुसंतांचीच परंपरा त्यांनी चालविली; व ती परंपरा पूर्वीच्या साधुसंतांप्रमाणे हरिकथा कीर्तनाचे व कवनाचे द्वारेंच चालविली. मात्र पूर्वीचे बरेच साधु पंढरीचे वारकरी होते व पांडु- रंगभक्ति त्यानीं उपदेशिली होती. रामदासांनी मात्र नवा पंथ काढण्याचा. प्रयत्न केला व तो पारहि पाडला. म्हणजे रामभक्ति त्यांनीं नवी उत्पन्न केली असें नाहीं. रामदासांनींच दासबोधांत म्हटल्याप्रमाणें राम हें राम- दासांच्या कुळाचें कुळदैवत होतें; त्यांचे पूर्वज मोठे रामभक्त होते व ही पिढीजात रामभक्ति रामदासांत उतरली व म्हणूनच त्यांनीं 'रामदास हें नांव धारण केले व रामायणातील रामाचा अत्यंत विश्वासु सेवक जो मारुती - रामदासांना पुढे पुढें लोक व त्यांचे शिष्य मारुतीचाच अवतार मानूं लागले- त्यांच्या देवालयाची जागोजाग स्थापना केली. ही एक नवी भक्ति उत्पन्न करण्याचा प्रयत्न; एक नवा पंथ काढण्याचा प्रयत्न व लोकांना पंढरीच्या वारकरी पंथापासून परावृत्त करून रामभक्त व मारुति- भक्त करण्याचा प्रयत्न हा रामदासांच्या भक्तिमार्गाचा विशेष होता असें दिसतें. पंढरीच्या वारकरीपंथाचे प्रवर्तक निरनिराळ्या जातीचे साधु होते व त्यांच्यामध्यें जातिभेद-निदान देवापुढे तरी- न मानण्याचा सांप्रदाय होता व जातिभेदावर ते आपल्या कवनांत सारखे कोरडे मारीत असत. रामदासाला आपल्या ब्राह्मण्यत्वाचा मोठा अभिमान होता व त्यांच्या हीन स्थितीबद्दल वाईट वाटत असे ही गोष्ट चवदाव्या दशकाच्या आठव्या समा- साच्या शेवटच्या त्यांच्या कळवळ्याचे उद्गारांवरून दिसून येते; व जाति- भेदाबद्दल दासबोधांत फारच क्वचित् उल्लेख आहेत व जे आहेत ते ह्या भेदाचे समर्थनपरच आहेत असे वाटतें. यावरून रामदासानीं रामदासी