पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. थोड्याशा समासांतील थोड्याशा वाक्यांवरून इतके व्यापक सिद्धांत काढणें बरोबर आहे किंवा नाहीं हा मोठा प्रश्न आहे. दासबोधांतील उपदेशाच्या येथपर्यंतच्या सिंहावलोकनावरून इतकी गोष्ट स्पष्ट दिसून येईल कीं, दासबोध या ग्रंथांत एकमुखी आध्यात्मिक उपदेश नाहीं. तर त्यांत उपदेशभेद आहे; पहिला उपदेश आध्यात्मिक व निवृत्तिपर आहे तर दुसरा उपदेश व्यावहारिक व प्रवृत्तिपर आहे. आतां असा उपदेश भेद होण्याचें कारण काय याचा जर आपण विचार करूं लागलों तर असे दिसतें कीं, रामदासांनी दासबोध निरनिराळ्या मन:- स्थितींत लिहिलेला आहे. पहिला भाग त्यांच्या आयुष्यांतील एका परि- स्थितीनुरूप लिहिलेला आहे; व दुसरा भाग महाराष्ट्रांत कायमचे राहू लागल्यानंतर त्यांच्या पहाण्यांत आलेल्या लोकस्थितीनुरूप लिहिलेला आहे असे वाटतें. अर्थात् या उपदेशभेदाची उपपत्ति रामदासांच्या आयुष्य- क्रमावरून लागणारी आहे. तेव्हां हा आयुष्यक्रम समजण्याकरितां राम- दासांचें चरित्र येथें देणें अवश्य आहे. पण हें चरित्रकथनाचें काम फार कठीण झाले आहे. रामदासांच्या चरित्र कथानाला लागणाऱ्या माहितीच्या अभाव हें काम कठीण झाले आहे असें मात्र नाहीं. सत्कार्यात्तेजक सभेनें रामदासी पंथाबद्दलचे कागद- पत्र छापून काढले आहेत व आणखी आणखी कागदपत्र छापले जात आहेत. पण हे सर्व कागदपत्र रामदांसाच्या शिष्यांनीं श्रद्धाबुद्धीनें लिहि- लेले आहेत; त्यांत ऐतिहासिक व विचिकत्सक बुद्धि कमी आहे. शिवाय रामदासांच्या चरित्राची साग्र बखर म्हणून जें पुस्तक आहे व अलीकडे लिहिलेलीं रामदासांचीं चरित्रें या बखरीवरून प्रायः लिहिलेली आहेत- तेंच मुळीं रामदासांच्या ज्येष्ठ बंधूच्या वंशांतील हनुमानस्वामी यानी राम- दासांच्या मरणानंतर सवारों वर्षांनी लिहिलेले आहे. या बखरींत राम- दासांसंबंध दैवी चमत्कार असमंजस गोष्टी व भाकडकथा इतक्या आहेत कीं 'उडदामाजी काळें गोरें काय निवडावें निवडणारें' असें प्रथमतः वाटतें. ही बखर मी दोनतीनदां वाचली. या बखरीचे तीन उद्देश अगदी स्पष्ट दिसून येतात. पहिला रामदास हे अवतारी पुरुष आहेत व ते