पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. मारुतीचा अवतार आहेत हें मनावर ठसविणें हा होय. हे दाखविण्याकरितां लेखकाच्या समजुतीप्रमाणें जितक्या गोष्टी घालतां आल्या तितक्या घातल्या आहेत; रामदासांचें वानरासारख्या या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणें; आपल्या खोलींत जेवतांना गुप्तपणें वानरें बरोबर घेणें; मारुती- बरोबर लंकेंत बिभीषणास जाऊन भेटणें; केव्हां केव्हां मारुतीचें रूप घेणें. पण या गोष्टी विचिकत्सक बुद्धीस पटत नाहींत व त्या भाकडकथांपैक आहेत असे म्हणणें प्राप्त होतें. या बखरीचा दुसरा उद्देश रामदास व शिवाजी यांचा निकट गुरुशिष्यसंबंध होता व रामदासांचा अवतार शिवाजीला त्याच्या राज्यस्थापनेंत मदत करण्याचा होता हैं दाखविणें हा होय. उ० या बखरींत शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीचे तीसबत्तीस तरी प्रसंग वर्णिलेल आहेत; शिवाय शिवाजी प्रत्येक गुरुवारी रामदासांस भेटावयास जात असत व त्याची प्रत्येक बाबतींत सल्लामसलत घेत असत असें प्रति- पादन केले आहे. या बखरीचा तिसरा उद्देश म्हणजे रामदास हे इतर तत्कालीन व पूर्वकालीन साधूंपेक्षां श्रेष्ठ होते हैं प्रतिपादन करणें हा होय. हे दाखविण्याकरितां बहुतेक सर्व साधूंच्या रामदासांशीं भेटी झाल्या व त्या सर्वांनी रामदासांना जास्त मान दिला असे सांगितले आहे. ७९ वरील विवेचनावरून ही रामदासांची बखर निरनिराळ्या व्रतांचें महात्म्य सांगणारी किंवा निरनिराळ्या देवांचें महात्म्य सांगणारी पुराणें आहेत त्या तऱ्हेचा ग्रंथ आहे असे दिसते. अर्थात् आपल्या आराध्यदैव- ताच्या महतीकरितां घातलेला यांत अतिशयोक्तीचा व असत्योक्तीचा भाग फार आहे. पण ज्याप्रमाणें पुराणांतून सुद्धां ऐतिहासिक दृष्टीनें भूतार्थ कोणता व कल्पितार्थ कोणता हें निवडून काढणे शक्य आहे त्याचप्रमाणें या बखरींतूनही भूतार्थाची व कल्पितार्थाची निवडानिवड करणे शक्य आहे. रामदासांनी आपल्या आयुष्यक्रमांत ज्या अलौकिक गोष्टी केल्या- .त्यांचें आद्वतीय ब्रह्मचर्य, त्यांची ओजस्वी कविता, त्यांची खडतर तपश्चर्या व तीर्थाटन, मोठ्या प्रमाणावर त्यांची मठस्थापना—त्या योगें त्यांना साधु व अवतारी पुरुष मानण्यांत येऊं लागलें व साधूंना ऋद्धिसिद्धि साध्य असतात; अवतारी पुरुषांना असंभवनीय व अशक्य गोष्टीहि करतां