पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. विद्याभ्यासाच्या काळाप्रमाणे याहि त्यांच्या आयुष्यांतील काळाची विश्वस- नीय माहिती मिळाली असती तर ती किती तरी मनोरंजक झाली असती. पण या बखरींत तसली माहिती मुळींच नाहीं. रामदासांची महती व अवतारीपणा दाखविणाऱ्या असंभवनीय गोष्टी मात्र सांगितल्या आहेत. त्यांतल्या एक दोन मासल्याकरितां देतों. ८२ रामदास उत्तरेकडच्या प्रवासांत काश्मीरास गेले होते. तेथे त्यांना नानक पंथाचा उत्पादक गुरुनानक भेटला (गुरुनानकाचा काळ सन १४६९ असा इतिहासांत दिला आहे ) व त्याच्या आध्यात्मिक प्रश्नांना रामदा- सांनीं सयुक्तिक व अनुभवसिद्ध अर्शी उत्तरें देऊन त्याचें समाधान केलें. तेव्हां त्यानें रामदासांपाशीं अनुग्रह मागितला व रामदासांनीं तुम्हांस पूर्वीच अनुग्रह झालेला आहे नवा नको; पण वाटल्यास रामचंद्राची पूजा करीत जा, असें हाटलें. त्याप्रमाणें गुरुनानकानें कबूल केलें ! (6 रामदास दक्षिणेकडच्या तीर्थयात्रेस जात असतां प्रत्यक्ष मारुती त्यांचे सोबतीस होता. रामदास व मारुती हे दोघेजण लंकेस गेले. तेथे त्यांना बिभीषण (रावणाचा भाऊ ) भेटला. विभीषणानें रामदासांचा फार सत्कार केला. व त्यानें मारुतीस प्रार्थना केली, "पूर्वी ज्ञानेश्वर असतांना नामदेव येथे येऊन कीर्तन श्रवण करवीत होते त्या दिवसापासून आज- पर्येत कीर्तन श्रवण झाले नाही. यास्तव रामदास यांचे कीर्तन श्रवण कर वावें" तेव्हां मारुतीच्या आज्ञेप्रमाणे रामदासांनी कीर्तन केलें व लंकेंत असेपर्यंत ते रोज कीर्तन करीत असत ! रामदासांनी बारा वर्षे तीर्थाटन केलें; मग ते सन १६४४ मध्ये आप- ल्या आईला व भावाला भेटण्यास जांब गाव आले. या वेळों आपला विद्याभ्यास व तीर्थाटन पुरे करून रामदास आपल्या पुढल्या आयुष्यांतील कामाला लागण्यास तयार झाले होते. व या काळींच एकादा भक्तिपंथ काढून त्या द्वारें लोकशिक्षणाचें काम करावें असा त्यांनीं निश्चय केला असावा व योग्य ठिकाण ठरविण्यांत त्यांचा कांहीं काल गेला असावा. कारण ते जांबांत कांहीं दिवस राहून पुनः घराबाहेर पडले व कृष्णेचें उगम स्थान जें महाबळेश्वर तेथें आले व कांहीं दिवस तेथे राहिले असें