पान:सफर मंगळावरची.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

पांढरा कावळा


 एक बगळा आणि एक कावळा दोघे जिवलग दोस्त होते. त्यांच्या दोस्तीकडे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. 'या कावळ्याबगळ्याची जोडी कशी काय जमली बुवा ?" अशीच सर्वजण चर्चा करीत.
 नदीच्या काठावर भरपूर झाडे होती. तिथली फळे खायला कावळा यायचा. निंबोणी बोरं, चिंचा अशी. ऋतुप्रमाणे मिळणारी फळं त्यांना मिळायची. एके दिवशी बगळ्याला खूप भूक लागली. नदीत कारखान्यातून सोडलेल्या मळीने मासेही जगत नव्हते. बगळ्याला उपास घडू लागले. मग त्यादिवशी कावळ्याला बगळा म्हणाला,
 "तुझं बरं आहे बाबा, फळं खाल्ली तरी भागतं."
 " तू पण ये ना वर, फळं खायला. बघ किती भारी लागतात. खाऊन तर बघं. "
 बगळा वरती गेला. आंबट तोंड करीत चिंचा, बोरं खाऊ लागला. कावळा कधी कधी पोळी, भाकरी, चपातीचा तुकडा आणीत असे. तेही बगळा खायचा. असे त्याचे दिवस चालले होते. असेच एकदा पोट भरल्यावर दोघे झाडाच्या फांदीवर गप्पा मारीत बसले होते. तेव्हा त्याला कावळा म्हणाला, "मी ही तुझ्यासारखा पांढराशुभ्र असतो तर किती छान झाले असते. "
 "कुणी सांगितलं तुला, काळा