पान:सफर मंगळावरची.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

दीप्तीची फजिती


 दीप्ती फारच अवखळ दंगामस्ती करणारी. आईला तिची सारखी काळजी वाटते. दंगा करण्यात पुढे पण कामाच्या नावाने बोंब. वेंधळेपणा एवढा की विचारायलाच नको. आईनं आपलं स्वावलंबनाचे धडे द्यावेत आणि दीप्तीने नेहमीप्रमाणे विसरावेत. अगदी सकाळी उठल्या उठल्याच,
 "आई माझा ब्रश सापडेना."
झालं. आईनं मग बाथरुममध्येच, कुठेतरी, काल ठेवलेला ब्रश शोधून द्यायचा. ब्रशवर पेस्ट घ्यायची नि ती ट्यूब जेवणाच्या टेबलावर, खिडकीत किंवा जाईल तिथं कुठेही ठेवायची. रात्री झोपताना बाकीचे दात घासायला जायचे तर त्यांची शोधत शोधता तारांबळ व्हायची. असं तिचं नेहमीच चाललेलं असायचं. एकदा आंघोळ करताना दीप्ती ओरडली,
 "आई टॉवेल दे ना."
 "माझा हात पिठाचा आहे, थांब जरा."
 "थंडी वाजतेय." दीप्ती रडक्या आवाजात ओरडली.
 "हा घे." असं म्हणत बाबांनी दिला टॉवेल.
शाळेत जाताना म्हणाली,  "आई, माझं मराठीचं पुस्तक बघितलंस का
ग?"

"हे बघ फ्रिजवर आहे. "

सफर मंगळावरची । ३१