या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समाशास्त्र ९६ गोष्टी असाव्या. सभा संपताच हा वृत्तान्त तयार करून त्यावर अध्यक्षाची सही घेऊन ठेविली पाहिजे. सारांश निःपक्षपाती असावा व निर्णय थोडक्यांत व बिनचूक लिहिलेले असावेत, गैरहजर सभासदाला वृत्तांत वाचून सभेत काय घडले याची योग्य कल्पना येण्याइतका तो व्यवस्थित असावा. त्यांत फक्त चुकीची दुरुस्ती करता येते. चुकीचे विधानाबद्दल बोलण्यास सभेत सवड मिळावी. प्रश्न विचारल्यास त्याची माहिती द्यावी. वृत्तांतमंजुरीवर चचों अगर वादविवाद करू नये. तो झाल्यास मागील सभेने घेतलेले निर्णय पुन्हा चर्चिल्यासारखे होते. सभेत वाचून तो वृत्तांत मंजूर व्हावा. ठरावाने चुकीची दुरुस्ती व्हावी. मागील सभेस जे हजर असतील त्यांनीच मते द्यावी. वृत्तान्त म्हणजे मागील सभेत घडलेल्या गोष्टींचा पुरावा होय. वृत्तान्तांत नसलेली गोष्ट झाली असल्यास शाबीत करता येते. वृत्तान्ताला कोर्ट ( prima facie ) प्रथमदर्शनी पुरावा मानते.

  • किरकोळ व अध्यक्षाचे परवानगीने ':—याचा अर्थ वाटेल ते विषय आयत्या वेळी नोटीस नसतां आणणे. हा नाहीं. किरकोळ म्हणजे महत्त्वाचे नव्हेत असे, ज्यांना विरोध नाहीं असे व आनुषंगिक स्वरूपाचे. तत्त्व मान्य झालेले आहे पण बिनमहत्त्वाच्या तपशिलाबाबतची बाब किरकोळ होय. सभासदांचा विरोध असेल तर तो विषय अध्यक्षाने घेऊ नये. आयत्या वेळचा म्हणून वाटेल त्या विषयाचे चर्चेला अध्यक्षाने वाव देऊ नये. सभाकार्य संपत आलेले असते, सभासद कंटाळलेले असतात. अशा वेळीं धूर्त कार्यकारी मंडळ महत्त्वाची बाब पुढे आणून चटकन् पास करून घेते. अध्यक्षाने संस्थेचे कार्य अडत असेल, संस्थेचे अपरिमित नुकसान होत असेल अगर अन्य रीतीने अन्याय होत असेल, तर ‘आयत्या वेळचा विषय म्हणून मांडण्यास परवानगी द्यावी. तथापि हेंही करण्यास सभेची संमति घेणे इष्ट आहे; नाहीं तर सभातहकुबाची सूचना येऊन अध्यक्षास कमीपणा येण्याचा संभव असतो. त्याचप्रमाणे उपस्थित सभासदांपैकी बहुसंख्यांक सभासद कार्यक्रम-पत्रिकेत नसलेली बाब जरूरीची व महत्त्वाची म्हणून चर्चेस घ्यावी अशी लेखी विनंति जेव्हा करतात, त्याही वेळी वरीलप्रमाण दृष्टि ठेवून अध्यक्षाने वागावे, अध्यक्षाचे परवानगीशिवाय कार्यक्रम-पत्रिकेत नसलेली बाब चर्चेस घेता येत नाहीं.

चर्चानियमनः–कार्यक्रमपत्रिकेतील क्रमाप्रमाणे विषय चर्चेला घेत