या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ ससानियमन व संचालन घालावेत अशी असेल तर दुसरे शब्द जे घालावेत .अगर जोडावेत म्हणून सुचविले असतील त्यांचेबाबत उपसूचना देता येते. मात्र जेव्हां उपसूचनेने सुचविलेले शब्द गाळावेत असा सभा निर्णय घेईल व उपसूचनेने सुचविलेले शब्द घालावेत अगर जोडावेत असा प्रश्न मांडला जाईल तेव्हांच त्यांत बदल करणारी उपसूचना देतां येते; म्हणजे शब्द गाळावेत व त्याऐवजी कांहीं जोडावेत अशी उपसूचना व जोडणाच्या शब्दांवावत तिला उपसूचना आल्यास ‘शब्द गाळावेत यासंबंधीचा भाग पृथक् प्रथम मतास घालावा व नंतर त्याऐवजी शब्द जोडण्याचा अगर घालण्याचा भाग विचारांत घ्यावा. त्यावरील उपसूचना घेऊन मग त्याचा निकाल व्हावा. * हे बिल आतां विचारांत घ्यावें? हा प्रश्न... आता हा शब्द गाळावा व सहा महिन्यांनी हे शब्द घालावेत ही उपसूचना. या उपसूचनेला * उपसूचनेतील ‘सहा महिन्यांनीं' या शब्दांबद्दल ‘एक महिन्याने' हे शब्द घालावेत ही उपसूचना. या परिस्थितीत पहिला प्रश्न उपसूचनेत गाळावे म्हणून सुचविलेले शब्द राहावेत हा मतास घालावा. राहूं नये असे मत पडल्यावर ‘सहा महिन्यांनी, हे शब्द घालावेत' हा भाग विचारांत घ्यावा. त्याला आलेली उपसूचना मांडू द्यावी. नंतर ८ ‘सहा महिन्यांनी हे सुचविलेले शब्द उपसूचनेत राहावेत? हा प्रश्न मतास टाकावा. राहावेत असे मत पडल्यास * “सहा महिन्यांनी हे शब्द घालावेत' हा प्रश्न मतास घालावा व तो पास झाल्यास ‘हें बिल सहा महिन्यांनी विचारांत घ्यावे हा दुरुस्त प्रश्न मतास टाकावा; ‘सहा महिन्यांनी हे सुचविलेले शब्द उपसूचनेत राहावेत' हा प्रश्न अमान्य होऊन राहू नये असे मत पडल्यास उपसूचनेत ‘एक महिन्याने हे शब्द घालावेत' हा प्रश्न मतास घालावा. तो पास झाल्यास दुरुस्त उपसूचना मतास घालावी म्हणजे ६ उपसूचनेत सुचविलेले शब्द ‘एक महिन्याने हे घालावेत ? हा प्रश्न मतास टाकावा. तो पास झाला म्हणजे पुढीलप्रमाणे दुरुस्त झालेला मुख्य प्रश्न मतास टाकावा. * हे बिल एक महिन्याने विचारात घ्यावे.” उपसूचनेवर उपसूचना आल्या म्हणजे अनेक प्रसंगी गोंधळ होतो. तो टाळण्यासाठीं अध्यक्षानें कांही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली उपसूचना जरूर तेथे विभागून विचारासाठी व मतासाठीं घातली पाहिजे. उपसुचनेवर उपसूचना आली म्हणजे पहिली उपसूचना ही तात्पुरती ऐनप्रश्न अगर सूचना ( Substantive proposition ) होते हे लक्षात घेऊन त्या